२८ फेब्रुवारी २०२२
चंद्रपूर शहरात घरासमोरून फिरणाऱ्या अस्वलीचा कुत्र्यांनी केला पाठलाग
चंद्रपूर शहरालगतच्या सीमावर्ती भागात वन्यप्राण्यांचा वावर मागील आठवडाभरापासून सुरू आहे. यातच 28 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरातील लक्ष्मीनगर, वडगाव या भागांमध्ये घरासमोरून अस्वल फिरत होती. त्यामुळे कुत्र्यांनी मोठ्याने भुंकणे सुरू केले. अस्वलीचा (bear) पाठलाग करत तिला हाकलून लावले. हे दृश्य रात्री जागे झालेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपले.
चंद्रपूर शहराजवळच्या सिटीपीएस वेकोलि भागांमध्ये वाघ बिबट यांचाही हैदोस वाढला असून, दोघांचा बळी गेलेला आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागामध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागातील खुल्या भूखंडामध्ये असलेली झाडे-झुडपे, अनावश्यक कचरा काढण्यात येत आहेत. मागील 5 दिवसांपूर्वी लक्ष्मीनगर वडगाव येथे घरासमोरून अस्वल फिरत असल्याचे दृश्य सीसी टिव्ही मध्ये कैद झाले होते. तेव्हापासून येथे नागरीक भयभीत असून, सावध आहेत. या भागात रात्री उशिरापर्यंत फिरणे बंद झाले आहे. आज मध्यरात्री गाडगे यांच्या घरासमोरून ही अस्वल फिरत होती. कुत्र्यांनी मोठ्याने भुंकणे सुरू केल्याने अनेकजण जागे झाले. निशांत चहांदे (Nishant Chahande) यांनी हे दृश्य मोबाईल मध्ये कैद केले. यावेळी कुत्र्यांनी (Dogs) अस्वली चां पाठलाग केला. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
Dogs chase bear walking in front of house at Laxminagar Wadgaon
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
