वाघ हल्ल्यातील मृताच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत व नोकरीच्या मागणीसाठी शिवसेनेचे बंडू हजारे यांचे बुधवारपासून मेजर गेटसमोर बेमुदत साखळी उपोषण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२२ फेब्रुवारी २०२२

वाघ हल्ल्यातील मृताच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत व नोकरीच्या मागणीसाठी शिवसेनेचे बंडू हजारे यांचे बुधवारपासून मेजर गेटसमोर बेमुदत साखळी उपोषण

वाघ हल्ल्यातील मृताच्या कुटुंबीयांना
१० लाखाची मदत व नोकरीच्या मागणीसाठी शिवसेनेचे बंडू हजारे यांचे बुधवारपासून मेजर गेटसमोर बेमुदत साखळी उपोषण




चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रमधील वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या कंत्राटी कामगाराच्या परिवाराला १० लाखाची मदत व घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी तसेच कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिवसेना नेते बंडू हजारे बुधवार, दिनांक 23 फेब्रुवारीपासून विद्युत केंद्राच्या मेजर गेट समोर बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत.


चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात वाघ, बीबट आणि अन्य वन्यप्राणी वास्तव्य करीत असून, दोघांचा मृत्यू झाला. या विरोधात जनमानसात संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी 22 फेब्रुवारी रोजी वाघाच्या बंदोबस्त करण्यासाठी सर्व पक्षीय मोर्चा निघाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितिन भटारकर यांनी उपोषण आंदोलन केले आहे. दरम्यान, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार यांनी भेटी देवून बैठका घेतल्या. मात्र, मृतांच्या कुटुंबीयांना मदत आणि नोकरीचे आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेनेचे बंडू हजारे यांनी या मागण्यांसाठी साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.

*भारतीय कामगार सेना संलग्न महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हा अध्यक्ष मा नगरसेवक बंडू हजारे यांचा नेतृत्वात 23/2/2022 पासून बबेमुदत साखळी उपोषण तसेचसोबत कार्याध्यक्ष कैलास तेलतुंमडे सचिव अमोल मेश्र।म दिनांक 17 /2/2022 cstps मधील कंत्राटी कामगार भोजराज मेश्र।म याच्यावर वाघाने हल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याने त्याचा परिवार फार मोठ नुकसान झाल्याने त्याची नुकसान भरपाई म्हणून cstps 10 लाख रुपये दयावे व घरचा एका मुलाला सरकारी नोकरी द्यावी या मागणीसाठी व🚩आडोरे राव या कंत्राटदार याच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा त्याचा अन्याया मुळे लोकेश सोनकुसरे याचा मृत्यू झाला होता तसेच कामगाराणा किमान वेतन न देणे pf न भरणे तसेस 🚩कुणाल एंटरप्राइजेस गेल्या 5 वर्षपासून कधीही वेळेवर पगार केला नाही त्यामुळे कामगार देशोधळील लागला त्याला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे.

sk इंजिनिअरिंग 8 वर्षपासून कामगारांना अन्याय करीत आहे महिन्याचा 8 9 दिवस काम देत आहे अशा अनेक मागणीसाठी उदया पासून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे*