लक्ष्मीनगर वडगाव येथे घरासमोरून अस्वल फिरत असल्याचे दृष्य सीसीटीव्हीत कैद - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शुक्रवार, फेब्रुवारी २५, २०२२

लक्ष्मीनगर वडगाव येथे घरासमोरून अस्वल फिरत असल्याचे दृष्य सीसीटीव्हीत कैद

लक्ष्मीनगर वडगाव येथे घरासमोरून अस्वल फिरत असल्याचे दृष्य सीसीटीव्हीत कैद

चंद्रपूर शहरालगतच्या सीमावर्ती भागात वन्यप्राण्यांचा वावर सुरू झाल्याचे मागील आठवडाभरापासून चित्र पाहायला मिळत आहे. यातच चंद्रपूर शहरातील लक्ष्मीनगर, वडगाव या भागांमध्ये घरासमोरून अस्वल जात असल्याचे चित्र मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहे.

आज सकाळी सीसीटिव्ही तपासल्यानंतर चक्क घरासमोरून फिरत असल्याचे दिसले आणि एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर शहराजवळच्या सिटी पीएस वेकोलि भागांमध्ये वाघ बिबट यांचाही हैदोस वाढला असून, दोघांचा बळी गेलेला आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागामध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागातील खुल्या भूखंडामध्ये असलेली झाडे-झुडपे, अनावश्यक कचरा तातडीने साफ करण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना दिले आहेत.