२३ फेब्रुवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीचे चंद्रपुरात आयोजन #chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१९ फेब्रुवारी २०२२

२३ फेब्रुवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीचे चंद्रपुरात आयोजन #chandrapur

२३ फेब्रुवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीचे चंद्रपुरात आयोजन
दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यामार्फत यावर्षी ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीचे आयोजन चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ८ नाट्य संस्थांचा सहभाग आहे सांस्कृतिक कार्य मंत्री माननीय श्री अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होत आहे उदयन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा नाट्य कलेचा प्रचार व प्रसार सर्वस्तरातून व्हावा, सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे हा उद्देश ठेवून शासन राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन गेली ५९ वर्षे करीत आहे या वर्षी ६० वर्षात राज्य नाट्य स्पर्धा पोहोचली आहे आपण या स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरता व कलावंतांना प्रोत्साहित करण्याकरिता सर्व रसिक प्रेक्षकांनी दिनांक २३ फेब्रुवारी ते दोन मार्च २०२२ या कालावधीत प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय श्री बीबीषण चवरे यांनी केले आहे. या स्पर्धेत एकूण ८ नाटके सादर होणार आहेत. त्यात २३ तारखेला आदिवासी बहुउद्देशीय लोककला अकादमी गडचिरोली संस्थेमार्फत नाटकाचे नाव अंधार डोह, लेखकाचे नाव सचिन गोटे, दिग्दर्शकाचे नाव भीमराव चव्हाण. २४ फेब्रुवारी ला अंजना उत्तम बहुउद्देशीय संस्था चिखलगाव जिल्हा यवतमाळ या संस्थेमार्फत नाटकाचे नाव क्षण एक पुरे, लेखकाचे नाव डॉक्टर माणिक दिनकर वडयाळकर, दिग्दर्शकाचे नाव शुभम रमेश उगले. 25 फेब्रुवारी ला चंद्रपुर थर्मल पावर स्टेशन ऑफिसर्स रिक्रिएशन सेंटर ऊर्जानगर, चंद्रपूर या संस्थेचे नाटकाचे नाव दोन मित्र, लेखकाचे नाव सुधाकर पाटील, दिग्दर्शकाचे नाव सुधाकर पाटील. २६ फेब्रुवारीला कल्याण बहुउद्देशीय संस्था यवतमाळ या संस्थेचे नाटकाचं नाव प्रियांका आणि दोन चोर, लेखकाचे नाव श्याम मनोहर, दिग्दर्शकाचे नाव अशोक अष्टीकर. तसेच २७ फेब्रुवारीला नवोदित चंद्रपूर या संस्थेचे नाटकाच नाव डार्क फॅंटसी, लेखकाचे नाव डॉ. माधवी भट, दिग्दर्शकाचे नाव प्रशांत कक्कड. तसेच २८ फेब्रुवारीला सावली बहुउद्देशीय संस्था यवतमाळ नाटकाचे नाव आई रिटायर होतेय, लेखकाचे नाव अशोक पटोळे, दिग्दर्शकाचे नाव डॉ. ललिता घोडे तसेच १ मार्चला श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान यवतमाळ या संस्थेचे नाटकाचे नाव प्रेमाची गोष्ट, लेखकाचे नाव श्याम, मनोहर दिग्दर्शकाचे नाव राजन टोंगो. तसेच २ मार्चला सूर्यवंशी साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर या संस्थेचे नाटकाचे नाव रूपक, लेखकाचे नाव रजनीश जोशी, दिग्दर्शकाचे नाव नूतन धवने. तरी या वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला चंद्रपूर रसिक प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद द्यावा. त्यासोबत महत्त्वाची सूचना आहे रसिक प्रेक्षकांनी नाट्यगृहात प्रवेश करताना २ डोज पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दाखवूनच व तिकीट विकत घेऊनच नाट्यगृहात प्रवेश करता येईल. असे आवाहन चंद्रपूर केंद्रावरचे समन्वयक श्री. सुशील सहारे यांनी केले आहे.