आ. मुनगंटीवार यांनी केली बल्लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनची पाहणी - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शनिवार, फेब्रुवारी २६, २०२२

आ. मुनगंटीवार यांनी केली बल्लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनची पाहणी

 चंद्रपूर-‍बल्‍लारपूर मार्गावर विसापूर गावानजिक उभारण्‍यात येणा-या बॉटनिकल गार्डनची पाहणी २६ फेब्रुवारी रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. याठिकाणच्‍या विविध कामांचा आढावा त्‍यांनी घेतला. जी कामे निधी अभावी प्रलंबित आहेत त्‍याची माहिती अधिका-यांकडून जाणून घेतली. हे बॉटनिकल गार्डन देशातील सर्वात उत्‍तम गार्डन ठरावे तसेच वनस्‍पती शास्‍त्राचा अभ्‍यास करण्‍यासाठी खुले विद्यापीठ ठरावे यादृष्‍टीने वनविभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांनी प्रयत्‍नांची शर्थ करावी असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. या परिसरात प्रशासकीय इमारत, वनविभागाचे कार्यालय, प्रदर्शन केंद्र, भूमीगत संग्रहालय, प्‍लॅनेटोरियम, फुलपाखरू उद्यान, विज्ञान केंद्र, मत्‍स्‍यालय, उपहारगृह, विज्ञान व उत्‍क्रांती पार्क या सर्व इमारतींचे निर्माणकार्य जवळपास शेवटच्‍या टप्‍प्‍यावर आहे. या बॉटनिकल गार्डनला पूर्णत्‍वाला नेण्‍यासाठी आणखी जवळपास रू.२० कोटी लागणार असून त्‍याची मागणी संबंधित विभागाकडे केली असल्‍याचे अधिका-यांनी सांगीतले. 


या विषयासंदर्भात २८ फेब्रुवारी रोजी सायं. ४.०० वा. वनविभागाचे प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक नागपूर, चंद्रपूर जिल्‍हयातील वनविभागाचे संबंधित अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व वरिष्‍ठ अधिकारी यांची झूम मिटींग घेण्‍यात येणार असून या बैठकीत आवश्‍यक बाबींवर चर्चा करण्‍यात येईल असे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. 


या पाहणी दौ-यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भास्‍करवार, उपअभियंता श्री. मेंढे, शाखा अभियंता अनिरूध्‍द विजयकर, विद्युत विभागाचे अभियंता येरगुडे, वनपाल नरेश भोवरे, आर्कीटेक्‍ट राहूल धुलप, कंत्राटदार जतीन पटेल, अभियंता तौषीक, किशोर पंदिलवार, राहूल टोंगे यांची उपस्थिती होती.