कोसमतोंडी येथील नाट्यकलावंत, सामाजिक कार्यकर्ते यशवंत बावनकर‌ यांचे निधन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०४ फेब्रुवारी २०२२

कोसमतोंडी येथील नाट्यकलावंत, सामाजिक कार्यकर्ते यशवंत बावनकर‌ यांचे निधन.संजीव बडोले 
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया

नवेगावबांध दि.४ फेब्रुवारी:-
सडकअर्जुनी  तालुक्यातील कोसमतोंडी निवासी प्रतिष्ठीत नागरीक यशवंत आत्माराम बावनकर यांचे वयाचे ६६ वर्षी दु:खद निधन ४ फेब्रुवारीला पहाटे २.१५ मिनिटांनी झाले.ते भाजयुमो सोशल मिडीया प्रभारी गोंदिया जिल्हा तथा जि.प.क्षेत्र प्रमुख पांढरी गौरेश बावनकर यांचे वडील होत. यशवंत बावनकर उत्कृष्ठ नाट्यकलावंत,वक्ता ,समाजसेवी होते.तसेच त्यांना दंडारीचा शौक होता. ते एक अष्टपैलु व्यक्तिमत्व होते. त्यांचे मृत्यू पश्चात पत्नी, एक मुलगा ,मुली व नातवंडे  असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.आज त्यांचेवर स्थानिक श्मशान घाटावर दुपारी २ वाजे अत्यंसंस्कार करण्यात आले.