भाकपा तर्फे केपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या समर्थनात धरणे आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२८ फेब्रुवारी २०२२

भाकपा तर्फे केपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या समर्थनात धरणे आंदोलन

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती:- भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे एकात्मिक बरांज कोळसा खान प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यांसाठी दि.३ मार्चला दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयाचे प्रांगणात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
     कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लि. बंगलोर प्रणित एकात्मिक बरांज खुली कोळसा खानच्या किलोनी ब्लॉकमध्ये येत असलेल्या नगर परिषद क्षेत्रातील चिंचोर्डी येथील शेतजमिनीचे संपादन अथवा खरेदी करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी कंपनी प्रबंधनाकडे केली आहे. जर या शेतजमिनी संपादित अथवा खरेदी न केल्यास इच्छामरणाची मागणी प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.त्याअनुसंगाने प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या कुटुंबासह खान क्षेत्रात दि.३ मार्चला सामूहिक इच्छामरण घेणार आहेत.  त्यांच्या या आंदोलनास पाठिंबा म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे दि.३ मार्चला दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयाचे प्रांगणात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड राजू गैनवार यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.