नवेगावबांध येथे आज शिवजन्मोत्सव.दुपारी नगरात भव्य शोभायात्रेचे आयोजन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१९ फेब्रुवारी २०२२

नवेगावबांध येथे आज शिवजन्मोत्सव.दुपारी नगरात भव्य शोभायात्रेचे आयोजन.


मराठी बाणा मित्रपरिवाराचे आयोजन.संजीव प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.18 फेब्रुवारी:-
येथील मराठी बाणा मित्र परिवार नवेगावबांध च्या वतीने उद्या दिनांक 19 फेब्रुवारी रोज शनिवार ला सकाळी 9.00 वाजता श्री छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. दुपारी 3.00 वाजता नगरातील मुख्य मार्गावरून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरीपण सदर श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात स्थानिक व परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, मराठी बाणा मित्रपरिवार नवेगावबांध च्या वतीने करण्यात आले आहे.