भद्रावतीत भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत अहेतेशाम अली यांची सदिच्छा भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२८ फेब्रुवारी २०२२

भद्रावतीत भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत अहेतेशाम अली यांची सदिच्छा भेट


*वरोरा माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा सत्कार करतांना
शिरीष उगे (भद्रावती/वरोरा प्रतिनिधी)
भद्रावती : आश्रय सेवा संस्था, भद्रावती आणि भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२/०२/२०२२ पासून होऊ घातलेल्या भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत भद्रावती येथे आज सदिच्छा भेट दिल्याबद्दल मा.नगराध्यक्ष-न.प. वरोरा अहेतेशाम अली यांचा आयोजक कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सुरु असलेल्या क्रिक्रेट स्पर्धेतील खेळाळूना अहेतेशाम अली यांनी आपल्या मनोगतातुन प्रोत्साहित केले. या दरम्यान आज होणारया रेशीमबाग़ जिमखाना नागपुर व ब्लास्टर11भद्रावती या दोन्ही संघाचा टॉस करून क्रिकेट स्पर्धे ची सुरवात केली. या प्रसंगी अहेतेशाम अली यांचा सोबत भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष-सुनील नामोजवार, माजी नगरसेवक-प्रशांत डाखरे, युवा मोर्चा चे पदाधिकारी अमित गुंडावार,इमरान खान, शीवा पांढरे, सामाजिक कार्यकर्ता-राहुल आत्राम, शेरू शेख, शहेबाज शेख, अजहर खान या प्रसंगी उपस्तित होते.