चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन तर्फे व्याख्यानमाला; बंडू धोत्रे यांनी केले मार्गदर्शन @banduplan - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० फेब्रुवारी २०२२

चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन तर्फे व्याख्यानमाला; बंडू धोत्रे यांनी केले मार्गदर्शन @banduplan

दिनांक १०/२/२२ रोजी चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन चंद्रपूर तर्फे स्व. ऍड. दादाजी देशकर आणि स्व. ऍड. प्रमोद आनंद यांचे स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत ३ रे पुष्प गुंफण्याकरिता प्रसिद्ध पर्यावरणवादी श्री. बंडू धोत्रे यांना "पर्यावरण आपले आरोग्य" या विषयावर उद्बोधन करण्याकरिता चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन च्या सभागृहात आमंत्रित केले होते. त्यांनी यावेळेस पर्यावरण आपले आरोग्य या विषयाचे महत्व सांगितले.यावेळेस मंचावर असोसिएशन चे अध्यक्ष ऍड अभय पाचपोर ,उपाध्यक्ष ऍड राजेश ठाकूर , सचिव ऍड आशिष धर्मपुरीवार उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन असोसिएशन चे सचिव ऍड आशिष धर्मपुरीवार यांनी तर आभारप्रदर्शन ऍड आशिष मुंधडा यांनी केले. या कार्यक्रमास असोसिएशनचे सर्व सन्माननीय अधिवक्ता गण मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.