Top News

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

  The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Cha...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०२२

अमेरिकेतील प्रख्‍यात उद्योजक लोकसारंग हरदास यांनी दिले 1.5 कोटी. 1.5 crore given by Loksarang Hardas, a famous American entrepreneur

अमेरिकेतील प्रख्‍यात उद्योजक लोकसारंग हरदास यांनी

एलआयटी इन्‍क्‍युबेशन सेंटरसाठी दिले रु. 1.5 कोटी

एलआयटी स्‍टार्टअप कट्टाचे थाटात उद्घाटन


नागपूर, 18 फेब्रुवारी

लक्ष्‍मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे माजी विद्यार्थी, मूळ नागपूरचे पण सध्‍या अमेरिकेत वास्‍तव्‍यास असलेले प्रख्‍यात उद्योजक लोकसारंग हरदास यांनी एलआयटीच्‍या इन्‍क्‍युबेशन सेंटरमध्‍ये पायाभूत सुविधा उभ्‍या करण्‍यासाठी 1.5 कोटी रुपये दिले आहेत.

एलआयटीमध्‍ये सुरू करण्‍यात आलेले इन्‍क्‍युबेशन सेंटर ही अतिशय नाविन्‍यपूर्ण कल्‍पना असून विद्यार्थ्‍यांचे भविष्‍य घडविण्‍यात मोठे योगदान देणार आहे. स्‍टार्टअप कट्टा या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना विविध क्षेत्रात यश प्राप्‍त करणा-या व्‍यक्‍तींशी संवाद साधता येईल व त्‍यांच्‍याकडून सकारात्‍मक ऊर्जा घेता येईल, असा विश्‍वास एलएज टोटली ऑसमचे संस्‍थापक व सीईओ असलेल्‍या लोकसारंग हरदास यांनी व्‍यक्‍त केला. लक्ष्‍मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी आणि लिटा (एलआयटी अलम्‍नी असोसिएशन)च्‍या वतीने शुक्रवारी एलआयटी इन्‍क्‍युबेशन सेंटरच्‍या एलआयटी स्‍टार्टअप कट्टाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

केमिकल इंजिनियरींग ऑडिटोरियममध्‍ये झालेल्‍या या कार्यक्रमाला त्‍यांच्‍या पत्‍नी डॉली हरदास यांची उपस्‍थ‍िती होती. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी लिटाचे अध्‍यक्ष माधव लाभे होते. एलआयटी संचालक डॉ. राजू मानकर, लिटाचे सचिव उत्‍कर्ष खोपकरइन्‍क्‍युबेशन सेंटर प्रोजेक्‍ट संचालक विनोद कालकोटवारसह-संचालक सचिन पळसोकरपूर्व अध्‍यक्ष अजय देशपांडेलिटा युथ फोरमचे मिली जुनेजा  चिन्‍मय गारवेतसेचमालपानी ग्रुपचे राजेश मालपानी यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

माधव लाभे यांनी सुरुवातीलाच सेंटरच्‍या पायाभूत सुविधांसाठी लोकसारंग हरदास 1.5 कोटी रुपये देणार असल्‍याची घोषणा करताचा सभागृहात मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित असलेल्‍या एलआयटीच्‍या आजी-माजी विद्यार्थ्‍यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

त्‍यानंतर अमलेश पुरोहित यांनी लोकसारंग हरदास यांची मुलाखत घेतली. नागपुरात मध्‍यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्‍मलेल्‍या लोकसारंग हरदास यांनी अमेरिकेपर्यंतचा प्रवास उलगडला. एलआयटीमधील विद्यार्थी जीवनयेथील पहिला संप अशा अनेक विषयांवर त्‍यांनी भाष्‍य केले.

आयुष्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक अनुभवातून शिकत गेलो, असे सांगताना हरदास यांनी आयुष्‍यात जर काही साध्‍य करायचे असेल तर विद्यार्थ्‍यांनी स्‍वत:ला मर्यादा घालू नयेचुकांतून शिकत जावेप्रत्‍येक संधीचा लाभ घ्‍यावाभरपूर व प्रामाणिक मेहनत करावी अशा अनेक टीप्‍स दिल्‍या.  

सुरुवातीला सचिन पळसोकर यांनी एलआयटी स्‍टार्टअप कट्टाची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विनोद कालकोटवार यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सुगंधा गारवे यांनी केले. एलआयटीचे संचालक डॉ. राजू मानकर यांनी आभार मानले.
1.5 crore given by Loksarang Hardas, a famous American entrepreneur


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.