पालक संवाद उद्बोधन कार्यक्रम; मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी साधला संवाद #ZpChandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ जानेवारी २०२२

पालक संवाद उद्बोधन कार्यक्रम; मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी साधला संवाद #ZpChandrapur

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमार्फत पालक संवाद उद्बोधन कार्यक्रम; मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी साधला संवाद एकंदरीत शाळेची शैक्षणिक व भौतिक  गुणवत्ता वाढावी , विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून मिशन गरुडझेप या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची सुरुवात झालेली आहे .

 जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमार्फत  युट्यूबच्या माध्यमातून प्रसारित पालक संवाद उद्बोधन कार्यक्रम मालिकेमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी  संवाद साधला. 


 या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अशा एकूण 60 शिक्षक -अधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा सुपर-60 ग्रुप तयार करण्यात आलेला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी दिली.