जयपाल सिंग मुंडा यांची आदिवासी समाजातर्फे जयंती साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०७ जानेवारी २०२२

जयपाल सिंग मुंडा यांची आदिवासी समाजातर्फे जयंती साजरी


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने १९२८ मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या भारतीय हाँकी टिमचे कँप्टन, राज्य घटना निर्मिती उपसमितीचे सदस्य व आदिवासी जमातींचे संविधानिक अधिकार सुरक्षित ठेवणारे माजी संसदपटू सदस्य मा. जयपाल सिंग मुंडा यांची ११९ वी जयंती आदिवासी समाज भवनाच्या खुल्या जत्रा मैदानावर वरोरा येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा वरोरा व आदिवासी कला संवर्धन समितीच्या वतीने नुकतीच साजरी करण्यात आली.
  यावेळी महिला सक्षमीकरण, वर्तमान समाजव्यवस्थेत आदिवासी महिलांचे स्थान तसेच आदिवासी महिलांनी विविध क्षेत्रांत केलेली उल्लेखनीय प्रगती, आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेला हारार्पण करून काव्यांगणचे राज्य कार्यकारी कार्याध्यक्ष प्रा. निरज आत्राम यांनी प्रतिमेचे पुजन केले. यावेळी शरद मडावी, आदिवासी कला संवर्धन समितीचे जिल्हाध्यक्ष परमानंद तिराणिक, नितीन आत्राम, ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा संघटिका रजनी मेश्राम, कोमल आत्राम, भोई समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अलका पचारे, जोशीला नागपूरे, आकाश सोयाम , रिया पचारे, अनिल मेश्राम, नत्थुजी वलादे व इतर सामाजिक कार्यक्षेत्रातील व्यक्तींची विशेष उपस्थिती होती.