बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ९२६ वर पोहचली | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, जानेवारी ०९, २०२२

बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ९२६ वर पोहचली |

 

Jan 09, 2022
10:23AM

१८५ निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ

आकाशवाणी

राज्य परीवहन - एसटी महामंडळानं काल १८५ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं. आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ९२६ वर पोहचली आहे. याशिवाय आतापर्यत महामंडळाने ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. गेल्या ७८ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.

दरम्यान, एस. टी. सेवा सुरू करण्यासाठी आता मंडळानं चारशे खासगी बस चालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चार खासगी कंपन्यांना महामंडळानं आदेश दिला आहे. महामंडळात कंत्राटी पध्दतीनं चालक नेमण्यासाठी नुकतीच एक बैठक घेण्यात आली होती. पुणे, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, नाशिक, औरंगाबाद, जळगाव आणि धुळे या विभागांसाठी प्रत्येकी ५० चालक पुरवण्यात येणार आहेत.  

दरम्यान, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान केल्या प्रकरणी आणि अधिनियमातल्या तरतुदींचं उल्लंघन केल्या प्रकरणी औद्योगिक न्यायालयानं महाराष्ट्र स्टेट कामगार संघटनेची मान्यता रद्द केली आहे.

 Maharashtra State Workers Union by Industrial Court