५०० दिवसापासून देशभर प्रदूषणविषयी जनजागृती करीत पायी निघालेला तरुण रविवारी चंद्रपुरात पोहचला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०९ जानेवारी २०२२

५०० दिवसापासून देशभर प्रदूषणविषयी जनजागृती करीत पायी निघालेला तरुण रविवारी चंद्रपुरात पोहचलानागपूर जिल्ह्यातील कामठीचा १९ वर्षाचा तरुण रोहन अग्रवाल मागील दिड वर्षापासून देशभ्रमणाला निघाला आणि ते सुद्धा पायी. या तरुणाने आतापर्यंत १६ राज्यांचा प्रवाससुद्धा पूर्ण केला आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी कसा घातक आहे. त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागणार, भावी पिढीसाठी प्लास्टिकची समस्या किती गंभीर राहू शकते यावर जनजागृती करण्यासाठी तो देशभर पायी प्रवास करतोय. रोहन रमेश अग्रवाल हा कामठीचा राहणारा. २५ ऑगस्ट २०२० रोजी तो banaras येथून गंगास्नान करून देशभ्रमण करण्यासाठी निघाला. १६ राज्यांचे भ्रमण करून तो चंद्रपुरात (Date 09/01/2022) पोहोचला. प्लास्टिक विरोधात व प्रदूषणाबाबत जनजागृती करायची हे ठरविले असल्याने त्यांनी प्लास्टिक प्रदूषणाबाबत बरीच माहिती सांगितली.चंद्रपूर येथे रामाडा तलाव परिसरात अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घेतले. यावेळी अग्रवाल यांनी आतापर्यंत केलेल्या जनजागृती ची माहिती दिली.

राेहनने आतापर्यंत उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिलनाडू, पाॅंडेचेरी, केरळ, कर्नाटक, गोवा आणि नागपूरवरून सडक-अर्जुनी असा २ हजार किलोमीटरचा प्रवास पायी तर २० हजार किलोमीटर कोणी लिप्ट देऊन वाहनातून प्रवास केला.