कोविड प्रतिबंधक नियमाचं काटेकोर पालन न झाल्यास अधिक कठोर निर्बंध लावले जातील- आरोग्यमंत्री @Rajeshtope - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०८ जानेवारी २०२२

कोविड प्रतिबंधक नियमाचं काटेकोर पालन न झाल्यास अधिक कठोर निर्बंध लावले जातील- आरोग्यमंत्री @Rajeshtope

 

कोविड प्रतिबंधक नियमाचं काटेकोर पालन न झाल्यास अधिक कठोर निर्बंध लावले जातील- आरोग्यमंत्री

Khabarbat

कोविड प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन न झाल्यास अधिक कडक निर्बंध लावले जातील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. आपण हळूहळू तिसऱ्या लाटेकडे सरकत आहोत, अशावेळी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन करण्याची निकड असल्याचं ते म्हणाले. चित्रपट, सिनेमागृह, मंदिरं यासारख्या ठिकाणी तातडीने प्रतिबंध घालण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र अशावेळी त्याठिकाणी गर्दी टाळायला हवी याकडे टोपे यांनी लक्ष वेधलं. मुंबईमधे कोविड १९ चे रुग्ण वेगानं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करण्याची गरज मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी व्यक्त केली असून, लगेच टाळेबंदी लावण्याची निकड नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.