विद्यार्थ्यांना वरोरा पोलिस स्टेशनच्या वतीने सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०२ जानेवारी २०२२

विद्यार्थ्यांना वरोरा पोलिस स्टेशनच्या वतीने सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे सायबर गुन्हे कसे घडतात त्याला आपण कसे सतर्क राहावयास पाहिजे याबाबत आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे विद्यार्थ्यांना वरोरा पोलिस स्टेशनच्या वतीने जनजागृती एका कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. "जागरूक वा सुरक्षित रहा" सायबर साक्षर नारा असणाऱ्या सायबर जनजागृती कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकिरण मडावी यांनी सायबर युग म्हणजे काय हे सांगून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण सायबर सुरक्षिततेची गरज बँक एटीएम संबंधित होत असलेली फसवणूक तसेच फेक लिंकचा वापर करून लोकांना फसवणे यासंबंधीचे मार्गदर्शन विविध व्हिडीओ क्लिप दाखवून विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे विषयी जागरूक केले.
यासोबतच लैंगिक भावना भडकणाऱ्या व्हिडिओ पासून दूर राहण्याचे आवाहन केले . यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष्य नोपाणी व आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंद निकेतन महाविद्यालय वुमन ग्रीन असेल समन्वयक प्राध्यापक डॉ. रंजना लाड, सदस्य प्राध्यापक डॉ. धनश्री पाचभाई, प्राध्यापक डॉ. संयोगिता वर्मा, प्राध्यापक कल्याणी आत्राम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन किरण मेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार निकिता माणुसमारे यांनी मानले.