पंजाबात मोदी बनाम चन्नी....! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ जानेवारी २०२२

पंजाबात मोदी बनाम चन्नी....!आले अंगावर तर घेतले शिंगावर अशी मराठीत लोकप्रिय म्हण आहे. तिची प्रचिती पंजाबात आली. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी पीएम व भाजपवाल्यांना शिंगावर घेतले. या घटनेने मनमोहन सिंग यांच्यानंतर दुसरे ' सिंग इज किंग ' ठरलेत चन्नी. यातून पंजाबची निवडणूक लढाई मोदी बनाम चन्नी बनली. चन्नी यांनी ही लढाई 'पंजाबियत विरूध्द मोदी-भाजप केली. त्यातून हवा पश्चिम बंगालच्या दिशेने जाणार हे स्पष्ट संकेत झळकू लागलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर गेले. हे जगानं बघितलं. हवामान खराब होतं. पावसाच्या सरी बरसल्या. मोदी यांच्या सभेला गर्दी नव्हती. नगण्य गर्दी मीडियाने दाखविली. त्यानंतर हॉयव्होल्टेज ड्रामा घडला. ते सुध्दा लोकांनी बघितलं. सुरक्षेत चूक झाली. इथपर्यंत ठिक होतं. खरचं चुक झाली की नाही. ते आता सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली समिती ठरविल. कदाचित हा निष्कर्ष निवडणूक निकालापर्यंत लांबविला जाईल. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली किंवा नाही. हे ठरविणाऱ्या अनेक एजेन्सीज आहेत. त्या त्यांचे काम करत असतात. हे अनेकदा सिध्द झाले. आतापर्यंत एकाही पंतप्रधानांनी माझ्या सुरक्षेत चुक झाली. हे जाहिररित्या सांगितल्याचे ऐकिवात नाही. अपवाद ठरले ते नरेंद्र मोदी. ते एवढ्यावरच थांबले असते. तरी लोक समजले असते. मात्र नरेंद्र मोदी म्हणाले, ' मै भटिंडा हवाई अड्डेपर जिंदा लौटा. बता देना अपने सीएम को ' हे विधान करून पंतप्रधानांनी सरळ सीएम चन्नी यांच्या वर चाल केली. तिथेही थांबले नाहीत. सरळ राष्ट्रपतींना भेटले. तेव्हा पंजाबमध्ये राष्ट्रपती शासन लावले जाण्याची चर्चा बळावली. वायूवेगाने केंद्र सरकारची चौकशी समिती पंजाबात पोहचली. पीएच्या सुरक्षेवर महिन्याला 50 कोटी रूपये खर्च होतात. म्हणजे रोज एक कोटी 60 लाख. हा खर्च दिल्लीत असले तर. दिल्ली बाहेर असले तर रोजचा खर्च अडीच कोटी रूपयांवर जातो. ताफ्यातील एक-एक गाडी सात-सात कोटीची असते. हा ताफा पुलावर थांबविला.ही एसपीजीची चूक. सभा रद्द झाल्यावरही अर्धा तास ताफा थांबविणे.हा एसपीजीचा हलगर्जीपणा होता. रस्ता सुरक्षित आहे. ही सांगण्याची जबाबदारी इंटेलिजन्स ब्युरोची असते. हा विभाग अजित डोभाड यांच्याकडे आहे.सुरक्षेचा तिहेरी घेरा असतो. ताफ्याच्या अगोदर तीन किलोमीटरवर रस्ते खुले करणाऱ्या सुरक्षा पथकाच्या गाड्या धावतात. याशिवाय मार्गात प्रत्येक दहा फुटावर दंडेधारी पोलिस तैनात असतात. अशी सुरक्षा व्यवस्था असताना सुरक्षेत चूक कशी घडते. हा प्रश्न आहे. या सुरक्षेत सीएमला सुध्दा एसपीजीच्या पास शिवाय पीएमजवळ जाता येत नाही. त्याचाही प्रोटोकॉल असतो. त्या सुरक्षा चुकीचा ठिंकरा सीएमवर फोडणे . हे धूर्त किंवा अति शहाणपणाचं लक्षण म्हणावं लागेल.

हे पीएम व भाजपवाल्यांचे सीएमच्या अंगावर जाणे कोणालाही पटले नाही. या राज्यातील पंजाबी शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदेलन केले. तेव्हा त्यांना खलिस्थानी म्हणणारे. आंदोलनजीवी ठरविणारे हेच होते. लालकिल्ल्या प्रकरणं घडलं. लखीमपूर कांड झालं. त्यात शेतकऱ्यांना डिवचण्याचाच प्रकार घडला. त्यांच्या देशभक्तीवर शंका घेण्यात आल्या. तरी त्यांनी अहिंसक मार्गाने आंदोलन केले. गालबोट लागणार नाही. ही पुर्ण खबरदारी घेतली. त्यांच्या राज्यात जावून सुरक्षा चुकेला. त्यांच्या मुख्यमंत्रावर खापर फोडणे. हत्येच्या कटाचा संशय घेणे. ही विधाने पंजाबी माणसाच्या नेकीवर, राष्ट्रभक्तीवर संशय घेणारे होय. ते सुध्दा पाच महिन्या अगोदर सत्तेवर आलेले. स्वत:ला आंबेडकरवादी पंजाबी म्हणणाऱ्या चन्नी यांच्यावर घेणे. ही मोठी चुक होती.
या चुकीसाठी माफ करणार ते चरणसिंग चन्नी कसले. त्यांच्यातील आंबेडकरीबाणा जागा झाला. अगोदर पत्रकार परिषद घेतली. सुरक्षा चुकीत संशय असणाऱ्यांना बाजूला केले. सत्तर हजार खूर्च्या .सातशे लोक सभेला. तिथं पीएम भाषणाला जाणार. ही नामूष्की टाळण्यासाठी मोदी व भाजपने रचलेला हा डाव आहे. पंजाबीयांना बदनाम करण्याची खेळी आहे. पंजाबच्या अस्मितेवर आणि स्वाभिमानावर हल्ला आहे. ते हलिकॅप्टरने जाणार होते. ते सडक मार्गे कसे निघाले. सभेची वेळ आणि 140 किलोमीटर प्रवास. तो सुध्दा पाकिस्थानच्या सिमेला लागून असलेल्या मार्गे हे कसे शक्य होते. संरक्षण मंत्रालयाची परवानगी होती का...! असे अनेक प्रश्न करीत सरळ मोदींना शिंगावर घेतले.

चन्नी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी सरदार पटेल यांच्या विधानाचा हवाल देत ट्वीट केला. त्यामध्ये म्हणाले, ज्याला कर्तव्यापेक्षा आपल्या प्राणाची चिंता अधिक असते. अशा व्यक्तिंनी जबाबदारीचं पद स्वीकारू नये. या ट्वीटने छप्पन इंची छातीचा घोष करणाऱ्यांची छाती छलनी झाली असावी. हे नाकारता येणार नाही. नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये जावून दिदीओ दिदी म्हणून जी चूक केली. मुख्य सचिव पोहचले नाही.यावरून तिथे राडा केला होता. जवाब तलब केला होता. तिच चूक पंजाबात केली. सुरक्षेतील चुकीला हत्येचा कट संबोधून केली . त्यासाठी दोषी सीएम चरणजित चन्नी यांना ठरविले. हा मोदी सरकारचा सवयीचा भाग तर नाही. असा संशय येवू लागला. हा डिजिटल मीडियाचा जमाना आहे. समाज माध्यमं पॉवरफुल आहेत. क्षणाक्षणाची माहिती देत असतात. फरिदाबादची जाहीर सभा फसली. हे सर्वांनी बघितले. त्यानंतर पीएमचा ताफा एकदम पुलावरच अडलेला दिसला. मी जिवंत परतलो. हे विधान भाजपवाल्यांच्या गळ्यातील फास बनला आहे. या भाजप खेळीने चन्नी यांचे महत्त्व वाढले. चन्नी सत्तेवर आले. त्यांनी वीज बिल माफ केले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. ऑटोवाल्यांचे चालान माफ केले. मुख्यमंत्र्यांचे दरवाजे लोकांसाठी खुले केले. मी आम आदमी. हे सरकार आम जनतेचे हे दाखवून अल्पावधीत लोकाच्या विश्वासाला पात्र ठरले. केजरीवालच्या आम आदमी पार्टीला प्रभावहिन केले. कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे अस्तित्व संपुष्टात आणले. पक्षातील नवज्योत सिंधू यांचे पंख छाटले. सिध्दू विरुध्द मोदी असा सामना व्हावा म्हणजे आपल्याला सीएम होता येईल. हे सिध्दू स्वप्न बघत होते. ती लढाई आता मोदी बनाम चन्नी अशी बनली. या घटनेने चवन्नी वाटणारे चन्नी आता ' सिंग इज किंग 'च्या ठिकाणी पोहचले आहेत.पंजाबात मोदींना विरोध आहे. त्या विरोधाचा आवाज चन्नी बनले आहेत. पीएमच्या सभेला सातशे लोक हे त्यांचे द्योतक आहे. कॉंग्रेसच्या हाती मोदी विरोधी मोहरा लागला. तो पंजाब तारेल. या सोबतच मजबूत दलित चेहरा बनून अन्य राज्यात कामी येणार. यावर पंजाब निवडणुकीत शिक्का मोर्तब होणे तेवढे बाकी आहे....!
-भूपेंद्र गणवीर
...............BG................