१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ऑनलाईन नोदंणी सुरु; चंद्रपूर शहरात ८ कोवॅक्सीन केंद्र राखीव - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, जानेवारी ०१, २०२२

१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ऑनलाईन नोदंणी सुरु; चंद्रपूर शहरात ८ कोवॅक्सीन केंद्र राखीवचंद्रपूर | शहरात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी शनिवार दिनांक १ जानेवारीला ऑनलाईन नोदंणी सुरु झाली असून, प्रत्यक्षात #लसीकरण ३ तारखेपासून होणार आहे. यासाठी शहरातील ८ कोवॅक्सीन केंद्र राखीव राहणार आहेत. 


चंद्रपूर शहरात मागील १६ जानेवारी २०२१ पासून कोविड१९ लसीकरणाला सुरुवात झाली. ९५ टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला असून, सुमारे ६२ टक्के लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. आता ३ जानेवारीपासून चंद्रपूरात १५ ते १८ वर्षांच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार असून, त्यासाठी  ८ कोवॅक्सीन केंद्र राखीव राहणार असल्याची माहिती शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांनी   डिसेंबर रोजी दिली. 


ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या प्रादुर्भावामुळे वाढते कोरोना रुग्णांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण वाढविण्यासाठी ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सिन लस देण्यात येईल. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी मनपा प्रशासनाद्वारे तयारी पूर्ण झाल्याची माहिती डॉ. वनिता गर्गेलवार यांनी दिली.


#Online #registration #immunization #children #covacine #Chandrapur #city