विकासात्मक परिवर्तनाची सुरुवात आपल्या गावापासून करा : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे आवाहन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, जानेवारी ०८, २०२२

विकासात्मक परिवर्तनाची सुरुवात आपल्या गावापासून करा : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे आवाहन


विकासात्मक परिवर्तनाची सुरुवात आपल्या गावापासून करा : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे आवाहनराष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषदेच्या संस्कारांमुळेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विकास कामाची दृष्टी मिळाली आहे. देशातील गुणात्मक व विकासात्मक परिवर्तनाची सुरुवात आपल्या गावापासून करावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले.

चंद्रपूर शहरातील नागपूर मार्गावर असलेल्या शकुंतला पार्क येथे आठ जानेवारी रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विदर्भ प्रांताच्या सुवर्ण महोत्सव संमेलनाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, आज विदर्भ प्रांतात विद्यार्थी परिषदेचे सुवर्ण महोत्सव अधिवेशन होत असताना मला स्व.बाळासाहेब देवरस, यंश्वतराव केळकर , दत्ताजी डिडोळकर, भाऊराव देवरस यांसारख्या ऋषी-कार्यकर्त्यांची आठवण येत आहे.

यावेळी मंचावर संघटनमंत्री आशिष चव्हाण, प्रांत अध्यक्ष योगेश येनोरकर , प्रांत मंत्री अखिलेश भारतीय यांची उपस्थिती होती.