शनिवार, जानेवारी ०८, २०२२

ताडोबातील खासगी रिसॉर्टमागे नवजात बाळ सापडला

वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा व अंधारी अभयारण्यातील आगरझरी येथे असलेल्या एका खाजगी रिसॉर्टच्या मागे नवजात शिशु सापडला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान या बाळाला गावातील पोलीस पाटील यांच्या घरी ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांना माहिती देण्यात आली.

अगर्झारी येथील या खाजगी रिसॉर्टमध्ये बाहेरील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे हा नवजात शिशु कोणी टाकून दिला, या बाबत शंका कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत. नवजात शिशु सुखरूप असून, दिसायला गोंडस असल्याचे सांगण्यात येत आहे.

A newborn baby was found behind a private resort in Tadoba
SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.