मंगळवार, जानेवारी ०४, २०२२

जुन्नर शहरातील नाले घेणार आता नवीन रुप- नगराध्यक्ष शाम पांडे यांची माहिती #junnar

जुन्नर शहरातील नाले घेणार आता नवीन रुप- नगराध्यक्ष शाम पांडे यांची माहितीजुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर नगरपरिषदेच्या वतीने सुमारे ३ कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन समारंभ दिनांक ४/१/२०२२ रोजी नुकताच संपन्न झाला. यामध्ये फिश मार्केट पासून कल्याण पेठ नाल्याचे तसेच तेली बुधवार पेठ नाल्याचे बांधकाम व काँक्रीटीकरण करणे.

खलीलपुरा सज्जाद बेपारी घराजवळील गल्लीत, अन्सार सौदागर घराजवळील गल्ली, तसेच मुस्तफा चौधरी घरामागे पाईप गटर व काँक्रीटीकरण करणे,

बेळे आळी चौक ते भोई आळी चौक रस्ता, खालचा माळीवाडा दत्तमंदिर समोरील गल्ली, तसेच दत्तात्रय बिडवई ते खंडू लोखंडे घरापर्यंत, गणपती मंदिर ते अजित वाणी घरापर्यंत पाईप गटर व काँक्रीटीकरण करणे. तसेच सिध्दांकर गल्ली, भगत गल्ली पाईप गटर व काँक्रीटीकरण करणे.

दिल्ली पेठ चौधरी घर ते नांगरे घरापर्यंत तसेच भास्कर घरापासून शेटे घरासमोरील पाईप गटर व काँक्रीटीकरण करणे.

शुक्रवार पेठ गणपती मंदिरापासून ते हनुमान मंदिर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे., आगर पेठ कालिका माता मंदिर ते हनुमान मंदिर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे तसेच शिपाई मोहल्ला शिवकुंज पतसंस्थेसमोरील बोळ, हैदरभाई घराजवळील गल्ली, मोकाशी घर ते चंदीपुरा रस्ता पाईप गटर व काँक्रीटीकरण करणे.

माई मोहल्ला शफी तिरंदाज घरासमोरील सर्व लेन, दर्गा जवळील गल्ली पाईप गटर व काँक्रीटीकरण करणे. मंगळवार पेठ इनामदार घराजवळ तसेच शहा यांच्या घरासमोरील गल्लीत पाईप गटर व काँक्रीटीकरण करणे. मुस्लिम समाज दफनभूमी अंतर्गत परिसर काँक्रीटीकरण करणे. इत्यादी सर्व कामांचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. प्रसंगी नगराध्यक्ष मा. श्री. शाम पांडे, उपनगराध्यक्ष श्री. दीपेश परदेशी, अलकाताई फुलपगार, अक्षय मांडवे, अविन फुलपगार, सुवर्णा बनकर, हजरा इनामदार, भाऊ कुंभार, कविता गुंजाळ, समीर भगत, आश्विनी गवळी, अंकिता गोसावी, सना मन्सुरी, फिरोज पठाण, सुनील ढोबळे, नरेंद्र तांबोळी इत्यादी सर्व उपस्थित होते.

सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्ष यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला व नगराध्यक्ष यांनी सदरहू कामांसाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणला. व आज रोजी सर्व कामांचे आदेश सर्व ठेकेदारांना दिले आहेत. नगराध्यक्ष यांच्या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये जुन्नर शहरात भरपूर विकासकामे झालेली आहेत. एकंदरीतच गेल्या ५ वर्षांमध्ये जुन्नर शहराचा चेहरामोहरा बदलल्याबद्दल सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नगराध्यक्ष यांनी ठेकेदारांना काम दर्जेदार व चांगल्या पद्धतीचे करण्याच्या सूचना दिल्या. व नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. एकंदरीतच कार्यक्रम संपन्न झाल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी जाहीर केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.