डाक विभागातील कर्मचा-र्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार - आ. किशोर जोरगेवार @jorgewar_speaks - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०२ जानेवारी २०२२

डाक विभागातील कर्मचा-र्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार - आ. किशोर जोरगेवार @jorgewar_speaks


भारतीय डाक कर्मचारी असोशिएशन चांदा विभागाच्या वतीन चौथ्या द्विवार्षिक  संयुक्त अधिवेशनाचे आयोजन


पोस्टमन महत्वाचा लोकसेवक आहे. काळ बदलत असला तरी आजही पोस्टाने आलेल्या पत्राचे महत्व असते. डाग विभागातील कर्मचा-र्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.आज रविवारी दिनांक २ जानेवारी रोजी भारतीय डाक कर्मचारी असोशिएशन चांदा विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात चैथ्या द्विवार्षिक संयुक्त अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बी.पी.ई.ए दिल्लीचे माजी राष्ट्रिय सेक्रेटरी एम.एस. चंदेल, बी.पी.ई.ए. मुबंई साउथ विभागाचे माजी सेक्रेटरी राजु खेबडे यांची मार्गदर्शक म्हणून, बी.पी.ई.ए मुबंई - चंद्रपूर चे माजी उपाध्यक्ष विजय खापणे यांची स्वागताध्यक्ष म्हणून तर रमेश अंजारीया, राम जमनू, रमेश टंेभरे, वसंत हरमाले, बी.डी देशमूख, प्रशांत तोरस्कर, मिलिंद कांबळे आदि मान्यवरांची प्रमूख पाहूणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती होती.

दरवर्षी 26 जानेवारीला पोस्टमनला आपण बुट आणि छत्री वितरित करण्याचा संकल्प केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगत येत्या 26 जाणेवारी पासून सदर उपक्रमाची सुरवात करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी बोलतांना केली. या कार्यक्रमाला डाक कर्मचारी असोशिएशनच्या पदाधिकारी व कर्मचा-र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.