कुऱ्हाडीने वार करून पत्नीला केले ठार | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०९ जानेवारी २०२२

कुऱ्हाडीने वार करून पत्नीला केले ठार |

   


पत्नीला कुऱ्हाडीने मारून जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे दि.८ शनिवारी रात्री घडली. पती पत्नीत रात्री वाद झाला वादानंतर पत्नीला  विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केले. घटनेनंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी राजू बावणे वय अंदाजे (42) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत योगिता राजू बावणे वय (वय 35) यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून, ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. 

Bhangaram Talodhi in Gondpipri taluka of Chandrapur district