सिध्दबलीतील पूर्व कामगाराना प्रलंबित वेतन व रोजगार द्यावा; माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची सूचना #hansrajahir - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ जानेवारी २०२२

सिध्दबलीतील पूर्व कामगाराना प्रलंबित वेतन व रोजगार द्यावा; माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची सूचना #hansrajahir

 सिध्दबलीतील पूर्व कामगाराना प्रलंबित वेतन व रोजगार द्यावा; माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची सूचना सिध्दबली कंपनीतील पूर्वीच्या 82 कामगारांचे वेतन व अन्य देय राशी तसेच त्यांना पूर्ववत नौकऱ्या  बहाल करण्याची सूचना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी ६ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला केली. 


हंसराज अहीर यांनी जिल्हा प्रशासन तसेच कंपनी अधिकाऱ्यांच्या चर्चेनुसार संबंधित कामगारांनी कामगार आयुक्तांच्या तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सर्व आवश्यक कागदपत्रे  सादर करुनही 10 वर्षापासून प्रकरण प्रलंबित असतांना या बाबतीत निर्णय झालेला नाही असे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. त्यावर येत्या 13 जानेवारीला सर्व विषयांना घेवून कामगार आयुक्त, जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी, वेकोलि प्रबंधन व  सिध्दबली कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी अहीर यांना या चर्चेप्रसंगी दिले.