Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

रविवार, जानेवारी १६, २०२२

माजी नगराध्यक्षाच्या पतीने घेतली विहिरीत उडी

मालडोंगरी जवळील विहीरीत घेतली उडी




चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा छायाताई तुमाने यांच्या पतीने मालडोंगरी येथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि १६ जानेवारीला उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव पुरूषोत्तम तुमाणे वय ६५ वर्ष रा. गुजरी वार्ड ब्रम्हपुरी असे आहे. ते माजी नगराध्यक्ष छायाताई तुमाने यांचे पती आहेत. मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून, सदर घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे हे करीत आहेत.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.