कोरोनाच्या नव्या निर्बधामुळे स्पर्धा पुढे ढकलली #DRama #Chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ जानेवारी २०२२

कोरोनाच्या नव्या निर्बधामुळे स्पर्धा पुढे ढकलली #DRama #Chandrapur

 प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलली 


सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, २०२१-२२ प्राथमिक फेरी शनिवार 15 जानेवारी 2022 पासून चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे होणार होती. मात्र, कोरोनाच्या नव्या निर्बधामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.  

२४ जानेवारीपर्यंत नियोजित या स्पर्धेत १० संस्था सहभागी होणार होत्या. यात  गडचिरोली , चंद्रपूर. ऊर्जानगर , यवतमाळ, चिखलगाव, वर्धा येथील नाट्य संस्थांचा सहभाग होता. शासनाचे पुढील आदेश येताच स्पर्धा होईल, अशी माहिती स्पर्धा समन्वयक सुशील सहारे यांनी दिली.