विपीन पालीवाल यांची चंद्रपूर मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०३ जानेवारी २०२२

विपीन पालीवाल यांची चंद्रपूर मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती
विपीन पालीवाल यांची चंद्रपूर मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती 

चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे नवे आयुक्त म्हणून विपीन पालीवाल (मुद्दा) यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी, (ता. ३ जानेवारी)  नगर विकास मंत्रालयाने जारी केले. 


महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका या पदावर श्री विपिन पालीवाल (मुद्दा) (मुख्याधिकारी गट-अ निवड श्रेणी) यांची प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत आहे, असे उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. 


आयुक्त, महानगरपालिका चंद्रपूर या पदावर कार्यरत असलेले राजेश मोहिते यांना 3 जानेवारी 2000 22 रोजी आयुक्त या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले.  श्री मोहिते हे सध्या वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याने त्यांना मंत्रालय येथे रुजू झाल्यानंतर नवीन पदस्थापना देण्यात येणार आहे.


विपीन पालीवाल (मुद्दा) हे २३ जून २०२१ पासून चंद्रपूर मनपात अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत कामठी, बल्लारपूर आणि वर्धा नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे.