#चंद्रपूर मनपाच्या नगरसेवकांना नवीन वर्षाची गिफ्ट; १० लाखांचा स्वेच्छा निधी मिळणार #Chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ जानेवारी २०२२

#चंद्रपूर मनपाच्या नगरसेवकांना नवीन वर्षाची गिफ्ट; १० लाखांचा स्वेच्छा निधी मिळणार #Chandrapur

 चंद्रपूर मनपाच्या नगरसेवकांना नवीन वर्षाची गिफ्ट; १० लाखांचा स्वेच्छा निधी मिळणार चंद्रपूर |  शहर महानगरपालिकेतील प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेवकांना दरवर्षी प्रत्येकी ५ लाख रुपये स्वेच्छानिधी देण्यात येतो. या निधीत वाढ करण्यात आली असून, तो १० लाख करण्याची सूचना स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी केली. 


नवीन वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात आज ६ जानेवारी रोजी राणी हिराई सभागृहात स्थायी समितीच्या विशेष सभेत त्यांनी ही घोषणा केली. स्वेच्छा निधी हा नगरसेवकासाठी हक्काचा असतो. प्रभागात विविध विकासकामे करताना या निधीचा उपयोग होत असतो. स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी शहरातील तरुणांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व शिकवणी वर्ग यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली. तसेच समाजभवनासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.