महापौरांनी सायंकाळी केली आझाद बगीचाची पाहणी #Chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत११ जानेवारी २०२२

महापौरांनी सायंकाळी केली आझाद बगीचाची पाहणी #Chandrapur

 महापौरांनी सायंकाळी केली आझाद बगीचाची पाहणी 
 महात्मा गांधी मार्गावर अगदी शहराच्या हृदयस्थळी आझाद बगिचा आहे. या बगिचाचे बांधकाम आणि सौंदर्यीकरण काम आता अंतिम टप्यात आले आहे. या कामाची पाहणी महापौर राखी कंचर्लावार यांनी ११ जानेवारी रोजी सायंकाळी केली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सभागृह नेता देवानंद वाढइ यांची उपस्थिती होती. 

पूर्वी येथे दररोज पहाटेपासूनच नागरिकांची वर्दळ सुरू होते. सायंकाळीही नागरिक मोकळ्या हवेत फिरायला या बागेत येत होते. त्यासाठी आझाद बागेचे सौंदर्यीकरण करून बालगोपाल, वयस्क, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा आणि फिरण्याची व्यवस्था केली जात आहे. काही ठिकाणी हिरवळ, प्रवेशद्वार, खेळणे आणि बसण्यासाठी आसने लावण्यात येत आहेत. लवकरच लोकांच्या सेवेत हा बगीचा येणार आहे