देशी दारूच्या दुकानातील रक्कम दिवाणजीने चोरल्याचे उघड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ जानेवारी २०२२

देशी दारूच्या दुकानातील रक्कम दिवाणजीने चोरल्याचे उघड

 

घनवटी नंबर १ येथे देशी दारूच्या दुकानातील रक्कम पळविणाऱ्या चोरट्यास कोठडी 


चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात असलेल्या उमरी पोद्दार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या घनवटी नंबर एक गावानजीक मंदिराजवळ एका देशी दारूच्या दुकानातील रक्कम पळविणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली. 14 जानेवारीला बंडू शंकरवार आणि यांच्या सहकार्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, याच दुकानातील दिवाणजीने दरोड्याचा बनाव करून रक्कम चोरल्याचे उघड झाले आहे.  


ठाणेदार नीलकंठ कुकडे आणि चंद्रपूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक गदादे यांनी दिवाणजी बंडू शंकरवार यांची कसून चौकशी केली असता घटनेचे बिंग फुटले. दरोड्याचे बनावट प्रकरण स्वतः असल्याचं मान्य केलं. यात एकूण रकमेपैकी एक लाख 32 हजार 240 रुपये प्रकरणातील साथीदार मुन्ना यांच्याकडून गुन्हे अन्वेषण विभागाच्या टीमने हस्तगत केले, तर 14 जानेवारीला बंडू शंकर यांच्या घरातून पोलिसांनी रक्कम हस्तगत केली. पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे  करत आहेत.


 #Chandrapur #Crime