चंद्रपूर | कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले #Chandrapur #Covid - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, जानेवारी ०४, २०२२

चंद्रपूर | कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले #Chandrapur #Covidचंद्रपूर | महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मंगळवारी आणखी ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २१ वर पोहोचली आहे. डिसेंबरअखेर चंद्रपूर शहरात केवळ १- २ रुग्ण होते. मात्र, नवीन वर्ष उजळताच सोमवार आणि मंगळवारी मोठी रुग्णसंख्या पुढे आली. या दोन दिवसात १५ रुग्ण वाढले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णांवर खासगी हॉस्पिटल, होम आयसीयूलेशन आणि मनपाच्या आसरा रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोनामुळे गत २ वर्षात शहरातील 438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.


गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 12 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 8, बल्लारपूर येथे 2, भद्रावती येथे 1, सिंदेवाही येथे 1 रुग्ण आढळून आले असून चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 913 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 339 झाली आहे. सध्या 30 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख  1 हजार 879 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 11 हजार 626 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1544 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.