प्रदूषणाविरोधात जनजागृती करणाऱ्या रोहनचे महापौरांच्या उपस्थितीत चंद्रपुरात स्वागत #Chandrapur #BJP - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, जानेवारी ०९, २०२२

प्रदूषणाविरोधात जनजागृती करणाऱ्या रोहनचे महापौरांच्या उपस्थितीत चंद्रपुरात स्वागत #Chandrapur #BJP
देशाटन करणाऱ्या रोहनचे चंद्रपुरात आगमन

महानगर भाजपाने केले स्वागत
प्लास्टिक बाबत जागृती निर्माण करणे,विविधतेत एकता प्रस्थापित करणे,संस्कृती-सभ्यता समजून घेण्यासाठी पायी देशाटन करणाऱ्या कामठी(नागपूर) येथील उत्साही 20 वर्षीय तरुणाचे रविवार(9जानेवारी)ला चंद्रपुरात आगमन झाले.या महत्वाकांक्षी तरुणाचे भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे,आ सुधीर मुनगंटीवार जनसम्पर्क कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कंचर्लावार,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,भाजपा नेते रवी आसवानी,देवानंद वाढई,मनोज सिंघवी,सूरज पेदुलवार, भारती दुधानी,संदीप देशपांडे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी रोहन अग्रवाल यांचा महापौर कंचर्लावार व जिल्हाध्यक्ष डॉ गुलवाडे यांचे हस्ते स्मृती चिन्ह,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.रोहनने या वेळी,माजी अर्थमंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सिंहावलोकन विकास पुस्तिकेचे अवलोकन केले.
या प्रसंगी डॉ गुलवाडे यांनी,रोहनच्या संकल्पाचे कौतुक करीत,पुढील प्रवासात काही अडचणी आल्या तर,भाजपा सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.तर,रोहन अग्रवाल यांनी,चंद्रपूरकरांना ऐतिहासिक वारसा जपत,संस्कृतीचे रक्षण करा,विविधतेमध्ये एकता हे व्यवहारात आणा,असे आवाहन केले.प्रकाश धारणे यांनी यावेळी आ.मुनगंटीवार यांच्या उल्लेखनीय विकासकामांची सखोल माहीती करून दिली.