चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वरोरा येथे ट्रक-ट्रॅव्हल चा भीषण अपघात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ जानेवारी २०२२

चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वरोरा येथे ट्रक-ट्रॅव्हल चा भीषण अपघात

अपघातात दोन्ही ड्रायव्हर जागीच ठार
 
शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
           : महामार्गावर वरोरा शहरातील आनंदवन चौक ते रत्नामाला चौक लागत लगान बार समोर झालेल्या भीषण अपघातात दोन ठार तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची घटना पाच वाजताच्या सुमारास घडली.        

अधिक माहिती नुसार चंद्रपूर वरून नागपूर कडे जाणारा ट्रक क्रमांक एम.एच. ३४ बीजी ९५४० ला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॉवेल्स क्र.एम.एच.४० एटी ४८१ ने वरोरा महामार्गावर द्विभाजक तोडून जबर धडक दिली. यात ट्रक चालक अमरदीयप बुजाडे, वय (३२) रा . चिखल गाव ता.वणी व ट्रॉव्हेल्स चालक शेख साबीर,वय (४८ ) रा. जलनगर चंद्रपूर यांचा जागीच मृत्यू झाला

         या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक २ तास खोळंबली होती. काही जख्मी प्रवासी ट्रॉव्हेल्स मध्ये फसल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी खूपच करावी लागली. जख्मीमध्ये हर्षदा झाडे, (वनली, ) सुमित मानकर,(वणी,) प्रवीण घाटे, (वरोरा,) प्रणाली नंदकटे, टेंभुर्डा सुरज दाते, मजरा, संतोष गाळगटे, (भद्रावती) रीना बागेसर, भोजराज बागेसर,अनिता परचाके (घुग्घुस),रूक्मा तुलस (कोरपना) सविता रांगडे, प्राची झगडे, सरस्वती डाहुले, आवेश अहमद (घुग्घुस) आदींचा समावेश आहे.
         ट्रॉव्हेल्स चालक मोबाईलवर बोलत असल्याने टॉवेल्स अनियंत्रित होऊन अपघात घटला असे सागितले जाते. तर टायर फुटल्याने ट्रॉव्हेल्स अनियंत्रित झाल्याचे बोलले जाते. याबाबत वरोरा पोलीस अधिक तपास करीत आहे.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जख्मींची विचारपुस केली.

ट्रॅव्हल्स चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने डीवाईडर वरील पोल तोडून ट्रकला धडक दिली. एवढी भीषण धडक होती की ट्रक व ट्राईव्हल्स चे दोन्ही ड्रायव्हर जागीच ठार झाले तर त्यांना क्रेनच्या साह्याने पात्रे तोडून काढावे लागले.  यामध्ये ट्रॅव्हल्स मधली दोन ते तीन प्रवासी ठार झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यांची नावे अजूनही समोर आली नाही. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते काही गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले.