नगर काँग्रेस अध्यक्ष जगदीश पवार यांना मातृशोक.८५ वर्षीय इंदिराबाई पवार यांचे वृद्धापकाळाने निधन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ जानेवारी २०२२

नगर काँग्रेस अध्यक्ष जगदीश पवार यांना मातृशोक.८५ वर्षीय इंदिराबाई पवार यांचे वृद्धापकाळाने निधन.

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.१जानेवारी:-
येथील प्रभाग क्रमांक २ येथील रहिवासी व नगराध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जगदीश पवार यांच्या मातोश्री इंदिराबाई झामसिंग पवार यांचे वृद्धापकाळाने आज दिनांक १ जानेवारी रोज शनिवारला सायंकाळी ७.०० वाजता निधन झाले. मृत्युसमयी त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे तीन मुले, एक मुलगी, स्नुषा ,नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर उद्या (दि.२जानेवारी) सकाळी ११.३० वाजता स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.