ताडी चे झाड बनले आदीवासी भागात उत्पादनाचे सांधन #BHamaragad - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ जानेवारी २०२२

ताडी चे झाड बनले आदीवासी भागात उत्पादनाचे सांधन #BHamaragad

 भामरागड तहसिल ही अतिदुर्गम डोगरांळ आदिवासीभाग म्हणून प्रचलीत आहे. ह्या भागांतील आदीवासीसमुह हा फारच गरीब असल्यामुळे ह्या भागात रोजगाराचे सांधन उपलब्ध नाही. आर्थीकरोजगार मिळविण्यासाठी आदीवासीभागातील लोंक शहरात स्थलांतरीत करीत आहे. अशातच ताडीचे झाडे त्यांच्यासाठी रोजगाराचे वरदान ठरले. भामरागड तहसीलमध्ये जवळपास 125 गावे आहे. प्रत्येक गावामध्ये ताडीचे झाडे भरपुरप्रमाणात आहे. ताडी हे ताडफळापासून तयार केले जाणारे पेय आहेत ताडाच्या झाडास माथ्यावर तीक्ष्ण हत्याराने खाच पाडल्यावर त्यातुन निघणारा रस हा रस त्या केलेल्या खाचेखाली मडके बांधून त्यात गोळा करतात. हा रस प्रकृतीने थंड असतो सूर्योदय झाल्यावर हा आंबतो त्यापूर्वीच हा पिणे योग्य असतो. या रसाने मूत्रप्रवृत्ती वाढते उन्हाळ्यात हा पिण्याने उन्हाचा त्रास होत नाही. ताडी हे ताडफळापासून तयार केले जाणारे पेय आहेत ताडाच्या झाडास माथ्यावर तीक्ष्ण हत्याराने खाच पाडल्यावर त्यातुन निघणारा रस हा रस त्या केलेल्या खाचेखाली मडके बांधून त्यात गोळा करतात. हा रस प्रकृतीने थंड असतो. सूर्योदय झाल्यावर हा आंबतो त्यापूर्वीच हा पिणे श्रेयस्कर असते. या रसाने मूत्रप्रवृत्ती वाढते उन्हाळ्यात हा पिण्याने उन्हाचा त्रास होत नाही. ताडीपासून गूळ व साखरही बनते ताडी आंबल्यावर पहिल्या ३ ते ८ तासात तिच्यात ३ टक्के एथिल अल्कोहोल बनते ही प्रक्रिया चालू राहिल्यास अल्कोहोल ५ टक्क्यापर्यंत वाढते त्याहून अधिक झाल्यास ताडी माणसाने पिण्याच्या लायकीची राहत नाही. ताडीचे दोन प्रकारचे झाड असतात आणी दिवसातुन तिन वेळा सकाळ दुपार व संध्याकाळ ताडी काढल्या जाते नर झाडः नर झाडची ताडी गोड असते हि ताडी सहकुटुंब पिता येते थोडिशी नशा येते सकाळचे ताडी असेल तर नशा मुळीच येत नाही. मादी झाडाची ताडी आंबट असते हि ताडी पितात याने नशा तर येतेच असं म्हणतात. हि ताडी पर्यटकाचे  आवडते पेय बनले आहे त्यामुळे अशी बहुगुणी ताडी भामरागड परिसरात  रोजगाराचे साधन बनले आहे.  


 - डाॅ. कैलास व्हि. निखाडे  निर्सग अभ्यासक