मंगळवार, जानेवारी ११, २०२२

खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्यांची भद्रावती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी @baludhanorkar

खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्यांची भद्रावती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णसेवा व ढिसाळ कार्यपद्धतीत त्वरित सुधारणा करा*
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तसेच जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येमध्ये सुद्धा मोठी वाढ होतांना दिसून येत आहे. यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपायासह सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर्स व आरोग्य यंत्रणेच्या चमूने उपचार सुविधांसह सज्ज राहावे अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी दिल्या.
भद्रावती तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते.

यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अासुटकर, भद्रावती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष सिंग, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत काळे, महिला काँग्रेस अध्यक्ष वर्षा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर, संजय पोडे, सध्या पोडे, भानुदास गायकवाड, अनिल चौधरी, प्रमोद मगरे, बाळू चिंचोलकर, सुमित मुळेवार, नयन जांभुळे, चंदू दानव, प्रदीप घागी, बसंत सिंग, सलाम शेख, राकेश दोतावार, अशोक येरगुडे, यशवंत वाघ, पंचायत समिती सदस्य चिंतामण आत्राम, नाजुका मंगाम, ग्रा.पं. सदस्या छाया जंगम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. असे सांगून खासदार धानोरकर म्हणाले, जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असून आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे. रुग्णालयांनी समन्वयपूर्वक कामे करावीत, संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, वाढीव उपचार सुविधा, औषध साठा यासह इतर सर्व पूर्वनियोजन प्रभावीपणे करून घ्यावे असे ते म्हणाले.

भद्रावती तालुक्यातील माजरी, घोरपेठ, भद्रावती, मुधोली, चंदनखेडा व डोंगरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना दौऱ्यात भेटी दिल्या. ओमिक्रोन व संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेचा पाश्वभूमीवर हा पाहणी दौरा केला. या दौऱ्यात वैद्यकीय अधिकारी MBBS, नर्सिंग, फॉर्मासिस्ट, आशावर्कर्स हि पदे तात्काळ भरण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आणि उपचार सुविधा तालुक्यात पूरेशा प्रमाणात तयार ठेवाव्यात तसेच व्यापक प्रमाणात जनजागृतीव्दारे संसर्गापासून बचाव करण्याचे नियोजन करण्याचे सूचित केले.तसेच कोरोनाचा नव्या व्हेरीयंटचा संसर्ग अधिक जोखमीचा ठरु शकतो, याचे गांभिर्य लक्षात घेऊन सर्वांनी पूर्व तयारीसह सज्ज राहणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी, खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भद्रावती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र माजरी, घोडपेठ, मुधोली, चंदनखेडा, डोंगरगाव तसेच भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. व प्राथमिक आरोग्य केंद्रातील, व ग्रामीण रुग्णालयातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.