सामाजिक जागृतीसाठी साहित्याचे लेखन साहित्तीकांनी निर्भिडपणे करावे - खासदार बाळुभाऊ धानोरकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत११ जानेवारी २०२२

सामाजिक जागृतीसाठी साहित्याचे लेखन साहित्तीकांनी निर्भिडपणे करावे - खासदार बाळुभाऊ धानोरकर


पंडित लोंढे लिखित "वळण" काव्यसंग्रहाचे विमोचन प्रसंगी*

वरोरा : झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा चा २२ वा वर्धापन दिन सोहळा तथा कवी पंडित लोंढे यांच्या "वळण" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कर्मविर विद्यालय, वरोरा येथे दि.९/१/२०२२ ला दिमाखदार सोहळ्यात पार पडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी साहित्तिक मा.धनंजय साळवे गटविकास अधिकारी पोंभुर्णा ,विशेष पाहुणे म्हणून खासदार बाळु धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्तिक आचार्य ना.गो.थुटे , मदनराव ठेंगणे, लक्ष्मणराव गमे, सुधाकर कडू , शरद तिखट हे होते. सर्व मान्यवरांचा सत्कार शाल ,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी सु.वि.साठे यांनी झाडीबोली गौरव गीत गायीले, प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष पंडित लोंढे यांनी केले त्यानंतर मा.तु खिरटकर यांनी दिवंगत संजयजी देवतळे माजी सांस्कृ.मंत्री म.रा. व झाडीबोली साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष दिवंगत बापुरावजी टोंगे यांच्या यांच्या योगदानाप्रती शब्दसुमनातून अवगत केले व दिपप्रज्वलन माल्यार्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी साहित्तिक मा.धनंजय साळवे गटविकास अधिकारी पोंभुर्णा ,विशेष पाहुणे म्हणून मा.बाळुभाऊ धानोरकर खासदार,चंद्रपूर ,मा.प्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य ना.गो.थुटे जेष्ठ साहित्तिक,मा.मदनराव ठेंगणे,लक्ष्मणराव गमे,सुधाकर कडू ,मा.शरद तिखट हे होते.ह्या सर्वांची भाषणे झाली.
कार्यक्रमात वळण काव्यसंग्रहाचे पुस्तकाचे भाष्यकार म्हणून मा.अविनाश पोईनकर युवा कवी तथा समाजसेवक तर मा.इरफान शेख प्रसिद्ध साहित्तिक यांचेसह विशेष अतिथी व मान्यवरांचे हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले.मंडळाचे वतीने आमदार महोदय प्रतिभाताई व कवी पंडित लोंढे यांचा वाढदिवस संयुक्तरित्या केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष कवी पंडित लोंढे यांचा व आचार्य ना.गो.थुटे ८ वे राज्यस्तरिय मराठी बोली साहित्य संमेलनाध्यक्ष यांचा साहित्तिक कार्याबद्दल मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. साहित्य चळवळ , "वळण" काव्यसंग्रहावर तसेच वरोरा झाडीबोली मंडळाच्या २२ वर्षाच्या वाटचालीवर मा.बाळूभाऊ धानोरकर यांनी स्तुतिसुमने उधळली.व साहित्य हे लेखकांनी ,कविंनी निर्भिडपणे लोककल्यानासाठी,लोकजागृतीसाठी निर्भयपणे लिहावे व त्याच्या संवर्धनासाठी आमचे सहकार्य नक्की राहिल हे अभिवचन दिले.मा प्रतिभाताईंनी वरोरा झाडीबोली मंडळाच्या कार्याबद्दल व उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
त्यानंतर इतर मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय साळवे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून नव साहित्तीक मंडळींना पुढे आणण्यासाठी जुन्या जाणत्या साहित्तीकांनी प्रयत्न करावे,व एक सशक्त लोकचळवळ उभी करावी त्यासाठी त्यांना बळ देण्याचे कार्य प्रत्येक गावागावातून घडावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे संचालन दीपक शीव यांनी तर आभार चंद्रशेखर कानकाटे सचिव यांनी मानले.दुसरे सत्र  स्व.बापुरावजी टोंगे यांचे स्मृतीप्रित्यर्थ निमंत्रितांचे बहारदार काव्यसंमेलन झाले या सत्राचे अध्यक्ष कवी नरेद्र कन्नाके होते तर मंचावर श्रीमती नानेबाई टोंगे व चंद्रकला मत्ते ह्या होत्या. हे होते त्या सत्रात तब्बल ३५ कविनी सहभाग घेतला त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सन्माणित करण्यात आले.संचालन कवयीत्री भारती लखमापूरे यांनी तर आभार कवी संजय जांभुळे यांनी मानले.
      एकंदरित बहारदार असा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झा.बो.सा.मंडळाचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.