महालक्ष्मी अनसूया माता ब्रह्मलीन दिनानिमित्त विविध धार्मिक सोहळा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, जानेवारी ०६, २०२२

महालक्ष्मी अनसूया माता ब्रह्मलीन दिनानिमित्त विविध धार्मिक सोहळा

        विश्वमोहिनी अनसूया माता (पारडसिंगा निवासिनी) ह्यांच्या सोमवार दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी २४ व्या ब्रह्मलीन दिनानिमित्त मा. मंत्री रमेश बंग, माजी आमदार प्रकाश गजभिये, गिरीश चंद्रशेखर वऱ्हाडपांडे, मा. आमदार दीनानाथ पडोळे, हरीषजी दुबे (माजी निगम सचिव), माजी आमदार विजय घोडमारे यांना आमंत्रित केले आहे. तसेच राजाभाऊ चिटणीस, मा. प्रभाकरराव देशमुख, सरपंच सौ. इंद्रायणी काळबांडे, हर्षदा गौतम मेश्राम, मंगलाताई रडके, जि. प. सदस्या सौ. रश्मी कोटगुले, श्री. सुभाष वऱ्हाडे, डॉ. रमेश पाटील, मा. गणेश धानोरकर यांच्या उपस्थितीत अनसूया माता मंदिर, शांती विद्या भवन, डिगडोह प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे. सकाळी ७. ३० ते ९.०० वाजेपर्यंत मातेचे मंगलस्नान पंडित हरीप्रसाद मिश्रा (वेदाचार्य) सह पूजा, अर्चना होमहवन, कार्यक्रम होईल. सकाळी ९. ३० वाजता दिंडी सोहळा डिगडोह (देवी) येथे प्रदक्षिणा जगदीश बँड पार्टी देविदास अडांगळे यांच्या मंगल धूनसहित काढण्यात येईल. सकाळी १०.०० वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येईल. दिलीप पनकुले परिवार आयोजित कार्यक्रमाला आपली सेवा रुजू करावी, ही विनंती. 

         दुपारी ११.३० वाजता छप्पनभोग व नैवद्य चढवण्यात येईल. दुपारी १.०० ते ३.०० वेदाचार्य पंडित हरिप्रसाद मिश्रा विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दुपारी ४.०० ते ६.००  जय दुर्गा भजनी मंडळ, डिगडोह व ६.०० ते ७.३० मा. दत्ता गणोरकर अनसूया माता भजन मंडळ आयोजित मंडळाचे भजन होईल. सायंकाळी ७. ३० वाजता महाआरती, गोपालकाला व महाप्रसाद वितरण करण्यात येईल. कार्यक्रमासाठी प्राची प्रवीण ढोले, सौ. वैशाली रोहित उपाध्ये, सौ. अनुराधा अनंत खोकले, सौ. सुचिता बाराहाते, पी. एस. चौबे, सोपानराव शिरसाट, वसंतराव घटाटे, राजेंद्र आसलकर, तात्यासाहेब मते, प्रा. एस. के. सिंह, राहुल पांडे, विजय कोटगुले, अभिजित शेंडे, नितीन रडके, योगेश मोहुर्ले, दीपक रडके, फैजल शेख, भीम तिवारी, अंकित कोल्हे, प्रकाश राठोड, अनिता फ्रान्सिस, ममता ढोरे, अनिल यावलकर, अजय धोटे, संजय शेवाळे, सौ. श्रृती सुधीर मुलमुले, सरदार रवींद्र मुल्ला, प्रमोद वानकर, बबलू चौहान, देविदास अडांगळे आदि भक्तगण व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत.