चंद्रपूर शहरातील कोरोना रुग्णमध्ये आणखी 32 रुग्णांची भर... शहरातील आकडा १२० - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०८ जानेवारी २०२२

चंद्रपूर शहरातील कोरोना रुग्णमध्ये आणखी 32 रुग्णांची भर... शहरातील आकडा १२०

 


नवीन वर्ष उजाडताच चंद्रपूर शहरातील रूग्ण संख्येत वाढ होत असून, (Date8 ) तब्बल ३२ रुग्णाची भर पडली. चंद्रपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १२० पर्यंत पोहोचली आहे. यातील ७१ रुग्ण गृह विलीगीकरणात ठेवण्यात आले आहेत. मनपा कोव्हीड केअर सेंटर मध्ये 11  रुग्ण संख्या असून, उर्वीत रुग्ण खासगीमध्ये भरती आहेत. 

मागील ४ दिवसापासून रुग्णसंख्या वाढत असल्याने महानगर प्रशासनाने आसरा हॉस्पिटल तातडीने रुग्णसेवेसाठी सुरु केले, शहरात सध्या दररोज ३०० व्यक्तीच्या चाचण्या होत आहेत. यातील १० टक्के व्यक्ती पॉझिटिव्ह निघत असल्याने धाकधूक वाढली आहे. मनपाच्या माध्यमातून ४ आरटीपीसीआर चाचणी केंद्र आणि ५अँटिजेन चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात आज 91 नवीन रुग्ण बाधीत झाले एकाने #कोरोना वर मात केली जिल्ह्यात शनिवारी मृत्यू संख्या शून्य आहे. सध्या 237 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 89, 123 तसेच बरे झालेल्यांची संख्या 87,341 झाली आहे.