22 वा वर्धापन दिन व कवी पंडित लोंढे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ जानेवारी २०२२

22 वा वर्धापन दिन व कवी पंडित लोंढे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)

: झाडीबोली साहित्य मंडळ वरोरा च्या वतीने 22 वा वर्धापनदिन व कवी पंडित लोंढे यांचा काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन दि. 9 जानेवारी 2022 ला सकाळी 11 वाजता कर्मवीर विद्यालय येथे आयोजित केले आहे.
या सोहळ्याला अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी धनंजय साळवे उपस्थित राहणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर राहणार आहे. तसेच प्रमुख अतीथी प्रसिद्ध साहित्यिक आचार्य ना.गो.थुटे, जेष्ठ सल्लागार मदन ठेंगणे, मु. अ. क. वि. शरद तिखट, पुस्तक प्रकाशन प्रसिद्ध कवी इरफान शेख, भाष्यकार युवा कवी अविनाश पोईनकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
याप्रसंगी राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कवी पंडित लोंढे यांनी लिहिलेल्या 'वळण' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व उदघाटन खासदार व आमदार च्या हस्ते करण्यात येणार आहे.

यानंतर कविसंमेलन चे आयोजन केले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी नरेंद्र कन्नके, तर प्रमुख अथिती नानेबाई टोंगे, चंद्रकला मत्ते उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन झडीबोली साहित्य मंडळ वरोरा यांनी केले आहे.