चंद्रपूर - नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोन ठार 15 ते 17 जण जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ जानेवारी २०२२

चंद्रपूर - नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोन ठार 15 ते 17 जण जखमी

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोन ठार 15 ते 17 जण जखमी

अपघातग्रस्तांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देशनागपूर येथून चंद्रपूरकडे निघालेली खासगी बस डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. त्याच वेळी चंद्रपूरकडून नागपूरला जाणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या धडकेत बस आणि ट्रकच्या ड्राइव्हरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बस मधील जवळपास १५ ते १७ प्रवाशी जखमी झालेत. जखमींना बस मधून काढून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यास आले आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

झालेल्या भीषण अपघाताबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेत्तिवार यांना नागपुर येथील बैठकीत माहिती मिळताच त्यांनी तातडीने बैठक आटोपती घेतली. लगेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांना फोन करून, अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले. अपघातग्रस्तांसाठी त्वरीत रुग्णवाहिका पाठवून ग्रामीण रुग्णालय, चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय येथे क्षणाचाही विलंब न करता उपचार करावे. अपघातानंतरचा एक तास अतिशय महत्वाचा असतो. जास्तीत जास्त रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असेही त्यांनी म्हटले. सर्व परिस्थितीवर पालकमंत्री लक्ष ठेवून आहेत.

#warora #Chandrapur #Nagpur #road #accident