चंद्रपुरात सर्वाधिक रूग्ण; चार दिवसात कोरोनाचे 131 रूग्ण! | #corona #Chandrapur - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, जानेवारी ०७, २०२२

चंद्रपुरात सर्वाधिक रूग्ण; चार दिवसात कोरोनाचे 131 रूग्ण! | #corona #Chandrapur

 corona मागील चार दिवसात तिसर्‍या लाटेतील रूग्णसंख्या झपाट्याने वाढली असून, 131 रूग्ण आढळून आले आहेत. तर सक्रीय रूग्णांची संख्या 147 झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात नव्या 47 रूग्णांची भर पडली आहे. तर चंद्रपूर महानगरात तब्बल 26 सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. 

 
cv
 
 
शुक्रवारी बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 26, बल्लारपूर 6, चंद्रपूर 4, भद्रावती 2, ब्रह्मपुरी 1, सिंदेवाही 1, गोंडपिपरी 1, राजुरा 5 तर कोरपना येथे 1 रुग्ण आढळून आले असून नागभीड, मुल, सावली, पोंभूर्णा, चिमूर, वरोरा, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.
 
 
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 89 हजार 32 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 340 झाली आहे. सध्या 147 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 6 हजार 472 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 7 लाख 15 हजार 905 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1545 बाधितांचे मृत्यू झाले आहेत.Positive today   24 Cumulative 25780 Negative today 428 Cumulative. 277322 Recovered   today.  0     be Cumulative 25276 Death today  0                  be Cumulative. 439      Test today . 452 Cumulative. 303102 Total Active. 65

एक्टिव पॉसिटीव्ह  65
- एकूण होम आयसीयूलेशन 54
- खासगी मध्ये भरती संख्या  3
- मनपा कोव्हीड केअर सेंटर रुग्ण संख्या 8