श्री संत झिंगुजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती गठीत #zinguji # Maharaj - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०६ डिसेंबर २०२१

श्री संत झिंगुजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती गठीत #zinguji # Maharaj*अध्यक्ष पवन मांढरे तर सचिव गौरव नागपुरे*रक्तदान शिबिराचे आयोजन

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
:- श्री संत झिंगुजी महाराज देवस्थान समितीचे वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि.११ व १२ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या पुण्यतिथी निमित्य नगरसेवक नंदुभाऊ पढाल यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका सभेत श्रीसंत झिंगुजी महाराज पुण्यतिथी तथा गोपाळकाला महोत्सव समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीत अध्यक्ष पवन प्रकाश मांढरे, सचिव गौरव सुभाष नागपुरे,कोषाध्यक्ष राकेश तुळशीराम मांढरे, उपाध्यक्ष आकाश शंकर नागपुरे, सहसचिव अशोक बापूराव पारशिवे, कार्याध्यक्ष म्हणून मनोहर दादाजी नागपुरे यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली आहे.तर सदस्य म्हणून सुनिल पारशिवे,भारत नागपुरे,दिलीप मांढरे, प्रभाकर पचारे,दिलीप नागपुरे, संजय मांढरे,किशोर नागपुरे, सुभाष नागपुरे आदींची निवड करण्यात आली.
कोरोना विषाणू पादुर्भावामुळे यावर्षी अगदी साध्या पद्धतीने पुण्यतिथी महोत्सव करण्याचे ठरले असून दि.११ डिसेंबरला सकाळी ५.३० वाजता मुर्तीपूजन करून घटस्थापना होईल. सकाळी ९.३० वाजता रक्तदान शिबीर, रात्री ८.३० वाजता जागृती भजन होईल.
दि.१२ डिसेंबरला सकाळी साफसफाई, पूजापाठ नंतर गोपाळकाल्याचे किर्तन व मिरवणूक काढण्यात येणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.