Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

शनिवार, डिसेंबर १८, २०२१

पाणी आणण्याच्या प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी स्थगिती देऊन केला विरोध

 जुन्नर /आनंद कांबळे 

जुन्नर नगरपालिकेची सर्वसाधारण सभेत माणिकडोह धरणातून बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी स्थगिती देऊन विरोध केला, अशी माहिती नगराध्यक्ष शाम पांडे,यांनी दिली.या सभेस गटनेते समीर भगत, सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, सना मन्सुरी, अलकाताई फुलपगार, फिरोज पठाण, जमिर कागदी, भाऊ कुंभार, हजरा इनामदार, समीना शेख, मोनाली म्हस्के, अक्षय मांडवे, नरेंद्र तांबोळी, सुनिल ढोबळे उपस्थित होते.


सदर मिटिंगच्या सुरुवातीला आजची सभा बेकायदेशीर असल्याचे जमीर कागदी यांनी भासवले. परंतु सदरची सभा ही कायदेशीर असुन आज सभेचे कामकाज होणार असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले व जमीर कागदी यांचा विषय सभागृहामध्ये हाणून पाडला. 

माणिकडोह धरणातून बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी आणण्याच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी विषयाला स्थगिती देऊन विरोध केला.


ह्या योजनेशी निगडीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग इत्यादी विभागांची नगरपालिकेच्या वतीने करारनामे करून देण्याच्या विषयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी स्थगिती देऊन खीळ घालण्याचा प्रयत्न केला.


 गेली ५ वर्षे योजनेचे आराखडे, अंदाजपत्रक याचे कामकाज सुरु होते व आजदेखील मीटिंगपूर्वी सदरहू माहिती आपण विरोधी पक्ष नगरसेवक घेऊ शकले असते हे वागणे बेजबाबदार पणाचे असून नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सभागृहामध्ये सदरहू योजनेची संपूर्ण माहिती दिली.

 #Water #NCP #JUNNER


 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी योजने संदर्भातील आराखडे इत्यादी बाबी ह्या अपूर्ण असल्याचे सांगितले. त्यावर नगराध्यक्ष यांनी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला.    


                            परंतु फक्त विरोधाला विरोध करण्याची मानसिकता ह्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सदर विषयाला स्थगिती दिली.असे पांडे म्हणाले


. सभागृहामध्ये ठरावाच्या विरोधामध्ये जमीर कागदी, भाऊ कुंभार, फिरोज पठाण, अक्षय मांडवे, मोनाली म्हस्के, हजरा इनामदार, समीना शेख विरोधी पक्षाची ही भूमिका अत्यंत चुकिची असून योजनेस खीळ बसल्यास ह्या कृतीला जबाबदार कोण? 

असे विचारत गटनेते समीर भगत यांनी निषेध केला. व ठरावाच्या बाजूने समीर भगत, अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर, सना मन्सुरी यांनी मतदान केले. अलकाताई फुलपगार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या भूमिकेवर रोष व्यक्त करत तटस्थ राहणे पसंत केले. *** 


जमीर कागदी व फिरोजभाई पठाण यांचे मत कुकडी पाटबंधारे विभागाशी करारनामा न करता त्याच बरोबर आजच्या सभेला सादर विषयाची माहिती मागितली असता त्या ठिकाणी एकही सक्षम अधिकारी हजर नव्हते. नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तसेच बांधकाम विभागाचे शहर अभियांता देशमुखसाहेब , पाणी विभागाचे अभियांता बिराजदार हे सर्व गैरहजर होते.


सदरच्या कामाची चुकीची माहिती शिवसेनेचे नागराध्यक्ष श्री. शाम पांडे यांनी सभाग्रहा पुढे मांडली परंतु प्रत्यक्षात एकही नगरसेवकांना न सांगता चुकीच्या पद्धतीने विषय मांडला असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते फिरोज पठाण व आघाडीचे गट नेते जमीर कागदी यांनी केले.


 राष्ट्रवादी काँग्रेस नेहेमीच विकासाच्या बाजूने राहिले आहे. पाणी योजनेला आमचा विरोध नाही परंतु चुकीच्या पद्धतीने काम करण्यास विरोध आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासासाठी कटीबध   आणि राहणार असल्याचे पठाण यांनी सांगितले.


 त्यामध्ये गुंठेवारी कायद्यातील बांधकामे नियमित करण्याचे राज्यशासनाचे आदेश यांची माहिती देण्यात आली. नगरपालिका कर्मचाऱ्यांचे स्वेच्छानिवृत्ती चे अर्ज व वारसाहक्क मंजूर करण्यात आले. आगामी येणारी शिवजयंती फेब्रुवारी २०२२ चे नियोजन मोठ्या प्रमाणावर करण्याचे ठरले.

शहरातील पेठा, रस्ते, गल्ल्या यांची जातिवाचक नावे बदलून त्याठिकाणी नवीन नावे देण्याच्या शासन निर्णयाच्या विषयाला सर्व सभासदांनी विरोध केला. जुन्नर शहराची ओळख असलेल्या पेठा, रस्ते, गल्ल्या यांची मूळ नावेच कायम ठेवावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.