विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थानला भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१३ डिसेंबर २०२१

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थानला भेट


विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थानला भेट
जुन्नर /आनंद कांबळे

महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी श्री लेण्याद्री गणपती देवस्थानास आज भेट दिली. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा व त्यांच्यासमवेत आलेल्या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेची विधीवत पूजन करण्यात आले. त्यांना देवस्थान करत असलेल्या विविध सामाजिक व धार्मिक कामांची माहिती देण्यात आली. त्यांनी श्री लेण्याद्री गणपती देवस्थानास सामाजिक कामाकरिता देणगी दिली.
याप्रसंगी श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थानच्या विकास कामांसंदर्भात तसेच येणाऱ्या भाविकांना द्यावयाच्या सोयीसुविधाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी देवस्थान पुढे असलेल्या समस्या त्यांना सांगण्यात आल्या. यावर डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन संबंधित विकास कामे करण्याविषयी सूचना केल्या. यामध्ये दर्शन मार्गावरील लाईट व्यवस्था, दर्शन मार्गावरील पिण्याचे शुद्ध पाणी व्यवस्था, दर्शन मार्गावरील प्रसाधनगृहे व्यवस्था, तसेच मंदिरातील लाईट व्यवस्था करणे संदर्भातील सूचना पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांना केल्या. तसेच देवस्थानने शासनास कोविड सेंटरकरिता दिलेल्या इमारतीचे दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात माननीय तहसीलदार साहेब जुन्नर यांना योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले व देवस्थानचे विकासासंदर्भात पुरातत्व विभाग व देवस्थान ट्रस्ट यांची वेळोवेळी मीटिंग घेऊन विविध विकास कामे पूर्ण करण्याचे निर्देश तहसीलदार साहेब यांना दिले. यावेळी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार श्री. शरददादा सोनवणे, जुन्नरचे तहसीलदार सबनीस साहेब,पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्री. दाभाडे साहेब, गोळेगाव ग्रामपंचायत सरपंच सौ. सुनीताताई मोधे, ग्रामसेवक कोल्हे साहेब, देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, सेक्रेटरी .जितेंद्र बिडवई विश्वस्त शंकर ताम्हाणे, श्री.जयवंत डोके तसेच गोळेगाव ग्रामस्थ गणेश लोखंडे, अरविंद बिडवई, राजेंद्र बिडवई, संदीप ताजणे, श्री.रवींद्र माळी, संदीप ताम्हाणे उपस्थित होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली


Visit of Neelmathai Gorhe to Shri Kshetra Lenyadri Devasthan