Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

गुरुवार, डिसेंबर ०९, २०२१

डिसेंट फाउंडेशनच्या वतीने कृष्णराव मुंढे विद्यालयास वेंडिंग मशीन भेट |जुन्नर /आनंद कांबळे 

कृष्णराव मुंढे आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर येथील निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश भाऊसाहेब चौधरी यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमा निमित्त या विद्यालयातील माजी विद्यार्थी आणि डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी फाउंडेशन च्या वतीने विद्यालयातील किशोरवयीन मुलींसाठी वेंडिंग मशीन उपलब्ध करून दिले आहे.

 गेल्या अनेक वर्षापासून डिसेंट फाऊंडेशन ही सामाजिक संस्था ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींसाठी काम करत असून जुन्नर तालुक्यातील पंचवीस महिला वैद्यकीय अधिकारी त्यांच्यासोबत काम करत आहेत. तसेच ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळी व मानसिक आरोग्य याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. त्याचबरोबर त्यांना ते सॅनिटरी पॅड व कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप देखील करत आहेत. त्याच प्रमाणे कृष्णराव मुंडे विद्यालयातील मुलींना शाळेतच सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावे या उद्देशाने डिसेंट फाउंडेशनच्या वतीने आपल्या शिक्षकाच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने वेंडिंग मशीन प्रदान करण्यात आले.  #Vending #machine #gift

यावेळी आदिवासी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी देवराव मुंडे, डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश चौधरी, मुख्याध्यापक देवराम पोटकुले, डिसेंट फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक एफ.बी. आतार , गृहपाल अर्चना पवार, आदिनाथ चव्हाण, माजी विद्यार्थी संदीप नवले, सत्यवान खंडागळे, राजाराम पाटील वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विवेक तांबोळी, सचिव मंगेश गाढवे, शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होते.

 यावेळी गृहपाल सौ अर्चना पवार यांनी मुलींना मासिक पाळी, आहार, व्यायाम व वैयक्तिक स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती गभाले यांनी केले. प्रास्ताविक एफ. बी. आतार यांनी केले. तर मुख्याध्यापक देवराम पोटकुले यांनी आभार मानले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.