शेतकऱ्यानी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा : जि प सदस्या सौ वैशालीताई शेरकी #vaishalisherki - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, डिसेंबर २३, २०२१

शेतकऱ्यानी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा : जि प सदस्या सौ वैशालीताई शेरकी #vaishalisherki


शेतकऱ्यानी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा : जि प सदस्या सौ वैशालीताई शेरकी

निमगाव येथिल पशुचिकित्सा ,लसीकरण शिबिरात 412 पशूंची तपासणी
पंचायत समिती सावली अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना निमगाव येथे पशुचिकित्सा व लसीकरण शिबिर घेण्यात येऊन पशुसंवर्धन।च्या विविध योजना व पशु ,शेळी व कुकुड पालन।विषयीचा मार्गदर्शन घेण्यात आले
शिबिराचे उद्घाटन जिप सदस्य। सौ वैशालीताई शेरकी यांनी केले अध्यक्षस्थानी सरपंच्या सौ गीता लाकडे होत्या प्रमुख अतिथी उपसरपंच राजू पा ठाकरे, लकेश लाकडे, सहा पशुधन विकास अधिकारी डॉ.बंडू आकनूरवार, गुरुदास ढोले, ईश्वर गंडाटे, किशोर खेडेकर,नामदेव राऊत,केशव मोहूर्ले होते,गोमातेची पूजा करून उद्घाटन करण्यात आले,वैशालीताई शेरकी यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनाचा व शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले, डॉ. बंडू आकनूरवार यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनेची,पशु,शेळी व कुकुड पालनाची माहिती देऊन,ग्रामस्थांनी कोवीड लसीचे दोन्ही लस न चुकता घेऊन कोविड नियमाचे पालन करून राष्ट्रीय कार्यक्रम।त सहभागी होण्याची विनंती केली शिबिराला पस चे पशुधन विकास अधिकारी डॉ डी बी कापगते यांनी भेट दिली शिबिरात 412 पशूंना पशुसेवा देऊन FMD लसीकरण,गर्भ,वंध्यत्व तपासणी, खचिकरण, लहान शस्त्रक्रिया,उपचार करण्यात आले
शिबीर यशस्वीते साठी पशुवैद्यकीय दवाखानाचे सहा पशुधन विकास अधिकारी डॉ बंडू आकनूरवार,कर्मचारी रवींद्र रामटेके,निवृत्त कर्मचारी गजानन पेदूरवार,धर्मराव चौधरी,ज्ञानेश्वर लाटकर,प्रोफेसर नेवारे व ग्रा प कर्मचारी काळबांधे यांनी परिश्रम घेतले