मेहा येथे अनियंत्रित ट्रॅक्टर घुसली घरात; बोरवेलची केली मोडतोड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१३ डिसेंबर २०२१

मेहा येथे अनियंत्रित ट्रॅक्टर घुसली घरात; बोरवेलची केली मोडतोडमेहा येथे अनियंत्रित ट्रॅक्टर घुसली घरात; बोरवेलची केली मोडतोड

सावली तालुक्यातील मेहा बुज. येथे बस स्थानक परिसरात उभी असलेली एक ट्रॅक्टर हमालाने चाबी लावून सुरू केल्याने ती अनियंत्रित होऊन चौकातील एका घरात घुसली. यादरम्यान बस स्थानक चौकातील हात पंपाची देखील मोडतोड झाली आहे.

रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर रेती खाली करून झाल्यानंतर ती मेहा बुज. येथील बसस्थानक चौकात उभी होती. यादरम्यान ट्रॅक्टरचा चालक खरा खाण्यासाठी पान ठेल्यावर गेला वर गेला होता. ट्रॅक्टरवर बसलेल्या हमालाने चाबी लावून ट्रॅक्टर सुरू करून एक्सलेटर दाबला. त्यामुळे ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन चौकातील हातपंपाची मोडतोड करीत पुढे जाऊन गिरमाजी कोलते यांच्या घराच्या भिंतीवर जाऊन धडक मारली. यात घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना 13 डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.Uncontrolled tractor rammed into house at Meha; Kelly breakage of borewell