@tv9marathi प्रतिनिधी निलेश डाहाट यांना झालेल्या मारहाणीचे विधानसभेत पडसाद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२७ डिसेंबर २०२१

@tv9marathi प्रतिनिधी निलेश डाहाट यांना झालेल्या मारहाणीचे विधानसभेत पडसाद
पत्रकार निलेश डाहाट यांना झालेल्या मारहाणीचे विधानसभेत पडसाद; इंदिरानगर परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी केला हल्ला

चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागात शिवसेना कार्यकर्ते विक्रांत सहारे आणि पवन नगराळे यांनी प्रादेशिक वृत्तवाहिनीचे पत्रकार निलेश डाहाट यांना बेदम मारहाण केली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत २७ डिसेंबर रोजी या हल्ल्याचा उल्लेख करत राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गृहमंत्र्यापुढे आणला.  

इंदिरानगर भागात पत्रकार विनोद बदखल आणि डाहाट गप्पा करत होते. तेव्हा सहारे-नगराळे यांनी तेथे पोचत अवैध धंद्यांची बातमी प्रकाशित केल्यावरून वाद केला. तो शांतही झाला. मात्र घटनास्थळावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या डाहाट यांचा सहारे-नगराळे जोडीने पाठलाग करून त्यांना रामबाग वसाहत वळणावरील मूल मार्गावरच्या माता मंदिराजवळ थांबवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. रस्त्यावरील बांधकामाचे गट्टू त्यांना मारण्यात आले. शस्त्राचा आणि चाकूचा धाक दाखविला गेला. जबर जखम झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.